Urfi Javed Controversy: कॅमेराप्रेमी उर्फी जावेद जेव्हा कॅमेरापासूनच पळ काढते...; हुडी घालून पोहोचली मुंबईच्या पोलीस ठाण्यात

अंगप्रदर्शन प्रकरणी उर्फीला मुंबई पोलिसांनी नोटीस दिली आहे.
Urfi Javed And Chitra Wagh
Urfi Javed And Chitra Wagh Saam Tv
Published On

Chitra Wagh Filed Complaint Against Urfi Javed: उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्या वाद गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. दोघीही एकमेकींवर अनेक आरोप-प्रत्यारोप करत आहेत. आता अंगप्रदर्शन प्रकरणी उर्फीला मुंबई पोलिसांनी नोटीस दिली आहे. तसेच तिला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात हजर राहावे लागणार आहे.

उर्फी जावेद आंबोली पोलीस स्टेशनला चौकशीसाठी हजर झाली आहे. चित्रा वाघ यांनी केलेल्या तक्रारीनंतर उर्फी चौकशीसाठी पोहचली आहे.

चित्रा वाघ यांनी 'ही बाई दिसल्यास तिचं थोबाड रंगवेन' असं म्हटलं होत. तेव्हापासून उर्फी आणि चित्रा वाघ यांच्या वादाला सुरूवात झाली. सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघी एकमेकींवर निशाणा साधत होत्या. त्यांच्या या वादात काही राजकीय नेत्यांनी उडी घेतल्यानंतर त्याला राजकीय वळण देखील आलं होतं.

Urfi Javed And Chitra Wagh
Ketaki Chitale News :...तर शरद पवार यांनाही प्रतिवादी करा, केतकी चितळेची हायकोर्टाला विनंती, कारण...

सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन प्रकरणी मुंबई पोलिसांची उर्फी जावेदला नोटीस पाठवली आहे. अंबोली पोलिस ठाण्यात उर्फी जावेदची चौकशी होणार आहे. उर्फीला आज आंबोली पोलिस ठाण्यात हजर होण्याची नोटीस जारी करण्यात आली आहे. चित्रा वाघ यांच्या तक्रारीची मुंबई पोलिसांनी दाखल घेत तिला असे आदेश दिले आहेत.

उर्फी जावेदच्या या प्रकरणात पोलीस आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश दिले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक शैला कोराडे यांची या प्रकरणी चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चित्रा वाघ यांच्या तक्रारीमुळे उर्फी जावेदच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. आता उर्फी काय करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

काल उर्फी जावेदने महिला अयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भेट घेतली होती. तेव्हा तिच्यासोबाबत तिचे वकील सुद्धा उपस्थित होते. उर्फीने चित्रा वाघ यांच्या विरोधात अद्याप तक्रार दाखल केलेली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com