Purva Pagare From Nashik Murder Or Suicide Case तबरेज शेख
मुंबई/पुणे

दुर्देवी: तिच्या वाढदिवशीच तिच्यावर अंत्यसंस्कार; नाशिकच्या पूर्वाची आत्महत्या की खून? 

Nashik Crime News: हा आत्महत्येचा नसून खुनाचा असल्याचा आरोप करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.

साम टिव्ही

तबरेज शेख, नाशिक

नाशिक: एका महाविद्यालयीन तरुणीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना ओझर परिसरात घडली आहे. याप्रकरणी तरुणीच्या काकांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप लेखी निवेदनाद्वारे केल्याने या प्रकणाला नवं वळण मिळालं आहे. पूर्वा नितीन पगारे (Purva Pagare Suicide Case) असं मृत तरुणीचं नाव असून ती १९ वर्षांची होती. (She was cremated on her birthday; Suicide or murder of purva from nashik)

हे देखील पहा -

पूर्वा नितीन पगारे, रा. हनुमान चौक, वेशीजवळ, ओझर (Ozar, Nashik) हिने दि. १८ मार्चला सायंकाळच्या वेळी घरात कुणी नसतांना ओढणीच्या सहाय्याने छताच्या हुकला गळफास घेत आत्महत्या केली. दरम्यान तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला असता पुर्वाचे काका अनिल पगारे, अजय पगारे आणि कुटुंबीयांनी सदर प्रकार हा आत्महत्येचा नसून खुनाचा असल्याचा आरोप करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. मात्र पोलिसांनी पगारे कुटुंबीयांची समजूत काढल्याने पूर्वाच्या नातेवाईकांनी तिचा मृतदेह ताब्यात घेतला. 

दरम्यान १९ तारखेला पूर्वाचा वाढदिवस होता, मात्र वाढदिवसाच्या दिवशी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वाईट वेळ तिच्या कुटुंबियांवर आली. घटनास्थळावरून तिचा मोबाईल गहाळ असल्याने तिच्या नातेवाईकांचा संशय बळावल्याने त्यांनी ओझर पोलीस ठाण्यात सदर प्रकार हा आत्महत्येचा (Suicide) नसून खूनाचा (Murder) असल्याने या प्रकरणाचा तपास करण्यात यावा या आशयाचे निवेदन दिले. याप्रकरणी पुढील तपास ओझर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक राहाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक स्वप्नील जाधव करीत आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT