Ambajogai Police Station
Ambajogai Police StationSaam Tv

संतापजनक! बीडच्या अंबाजोगाईत 8 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार...

शिक्षणाची पंढरी समजल्या जाणाऱ्या अंबाजोगाईतील घटनेने राज्यात खळबळ...
Published on

बीड - कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून गाजत असणाऱ्या बीड (Beed) जिल्ह्यात, पुन्हा एकदा धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. रस्त्यावर खेळत असलेल्या अवघ्या 8 वर्षाच्या चिमुकलीला घरात बोलावून, 23 वर्षीय नराधम तरुणाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने अंबाजोगाईसह (Ambajogai) राज्यात खळबळ माजली असून आरोपीला पोलीसांनी (Police) अटक केली आहे.

हे देखील पहा -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबाजोगाई तालुक्यातील एक 8 वर्षीय चिमुकली घराबाहेर रस्त्यावर खेळत होती. यावेळी गावातील किरण शेरेकर या रिक्षा चालकाने, मुलीला घरात बोलावून घेतले व तिच्यावर अत्याचार केल्याची घटना 19 मार्चला दुपारी 3 च्या दरम्यान घडलीय. तर हा प्रकार चिमुकलीने घरी सांगितल्यानंतर घटनेला वाचा फुटली.

Ambajogai Police Station
ठाण्यात मध्यरात्रीच्या सुमारास सिलेंडरचा स्फोट; चौघे जखमी

पिडीत चिमुकलीच्या चुलत्याने दिलेल्या तक्रारीवरून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी किरण राजाभाऊ शेरेकर रा. डोंगरपिंपळा या रिक्षा चालकाविरुद्ध कलम 376, 376 (F), 376 (L) 504, 4, 6 बाललैंगिक अत्याचार नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपीला पोलीसांनी अटक केली असून न्यायालयाने आरोपीस 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या घटनेने राज्यात खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com