Air India Plane Crash Saam Tv
मुंबई/पुणे

Air India Plane Crash: ड्युटीसाठी घरातून बाहेर पडली, परत आलीच नाही; विमान अपघातात पनवेलच्या एअर होस्टेस मैथिलीचा करुण अंत

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातामध्ये पनवेलमध्ये राहणाऱ्या मैथिली पाटीलचा दुर्दैवी मृत्यू झाला. मैथिलीच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. मैथिली एअर होस्टेस म्हणून काम करत होती.

Priya More

अहमदाबादमध्ये आज भयंकर विमान अपघात झाला. या अपघातामध्ये महाराष्ट्रातील अनेक जणांचा मृत्यू झाला. या भीषण अपघातामध्ये पनवेल तालुक्यातील न्हावा गावची मैथिली मोरेश्वर पाटीलचा देखील मृत्यू झाला. मैथिली पाटील एअर होस्टेस होती. मैथिलीच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. तिच्या मृत्यूचे वृत्त कळताच न्हावा गावावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मैथिली पाटीलचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. तिला आज अहमदाबादवरून लंडनला जाणाऱ्या विमानात ड्युटी लागली होती. बुधवारी दुपारच्या सुमारास मैथिली न्हावा गावातून आपल्या ड्युटीसाठी गेली होती. कामावर गेलेली मैथिली पुन्हा येणार नाही असे तिच्या कुटुंबीयांना वाटले सुद्धा नव्हते. आई-वडील, दोन बहिणी आणि एकुलता एक भाऊ असा मैथिलीचा परिवार आहे. मैथिली घरातील सर्वात मोठी मुलगी होती.

न्हावा गावातील टी एस रहेमान शाळेत मैथिलीने बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. मैथिलीने अगदी लहानपणापासूनच एअर होस्टेस बनण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. घरची स्थिती एवढी पण चांगली नव्हती तरीही हालाखीच्या परिस्थितीत तिने शिक्षण घेतले आणि दोन वर्षापूर्वी तिने एव्हिएशनचे शिक्षण पूर्ण करून एअर इंडियात कामाला लागली होती.

न्हावासारख्या ग्रामीण भागात राहून मैथिलीने नेहमीच याठिकाणावरून प्रवास करून आपली नोकरी सांभाळत होती. बुधवारीच ती लंडनला विमानात ड्युटीवर जायचे आहे असे सांगून न्हावा येथील घरातून निघून गेली होती. न्हावा गावाचे माजी सरपंच जितेंद्र दामोदर म्हात्रे यांच्या चुलत भाचीची ती मुलगी आहे. मैथिलीच्या मृत्यूमुळे पाटील कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भुसावळ विद्यार्थी सुरक्षेसाठी दामिनी पथकाची धडक मोहीम

Mumbai Mayor Accident: मुंबई महापौरांच्या गाडीला अपघात; धडाधड तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या

Sindhudurg Fort : कोकण किनाऱ्यावरील ऐतिहासिक वैभव! खूप कमी लोकांना माहितेय छत्रपती शिवाजी महाराजांचा 'हा' किल्ला

Bollywood Singer : अरिजीत सिंहनंतर बॉलिवूडचा आणखी एक प्रसिद्ध संगीतकार घेणार Retirement? 'त्या' पोस्टने रंगली चर्चा

Monsoon Upate : मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात पावसाचा यलो अलर्ट; पुढील ४ ते ५ दिवसात अख्खं राज्य व्यापणार मान्सून

SCROLL FOR NEXT