Sindhudurg Fort : कोकण किनाऱ्यावरील ऐतिहासिक वैभव! खूप कमी लोकांना माहितेय छत्रपती शिवाजी महाराजांचा 'हा' किल्ला

Shreya Maskar

सिंधुदुर्ग

निवती किल्ल्यावरून अरबी समुद्राचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणच्या दक्षिणेस अंदाजे 10 किमी अंतरावर निवती किल्ला आहे.

Sindhudurg | google

निवती किल्ला

निवती किल्ला (किल्ले निवती) हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला १७व्या शतकातील मराठा सागरी किल्ला आहे. कोकणात गेल्यावर या ठिकाणाला नक्की भेट द्या.

Nivati Fort | google

कसं जाल?

कुडाळ रेल्वे स्टेशन आणि कणकवली रेल्वे स्टेशन हे निवती किल्ल्याजवळ आहे. स्टेशनला उतरून तुम्ही पुढे रिक्षाने या किल्ल्या जवळ पोहचाल.

how do you go | google

छत्रपती शिवाजी महाराज

विस्तारणाऱ्या नौदल साम्राज्याचे रक्षण करण्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६४ मध्ये 'निवती किल्ला' हा एक मोक्याचा सागरी गड म्हणून उभारला. तसेच कर्ली खाडी व वेंगुर्ला बंदरावर बारीक लक्ष ठेवण्यासाठी किल्ल्याची उभारणी केली.

Chhatrapati Shivaji Maharaj | pinterest

किल्ल्याची रचना

किल्ले निवती हा एक ऐतिहासिक सागरी किल्ला आहे. ३०० फूट उंच खडकाळ टेकडीवर ४-५ एकर परिसरात पसरलेल्या या किल्ल्यावर तटबंदी, संरक्षणात्मक खंदक आणि खडकात कोरलेल्या प्राचीन जलप्रणाली पाहायला मिळतात.

Fort structure | google

निवती बीच

सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवती बीच हा कोकण किनारपट्टीवरील पांढऱ्या वाळूच शांत समुद्रकिनारा आहे. येथे सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.

Nivati Beach | google

निसर्ग सौंदर्य

निवती किल्ल्यावरून आणि किल्ल्याच्या आजूबाजूला सुंदर हिरवागार निसर्ग पाहायला मिळतो. पक्षी निरीक्षणासाठी येथे आवर्जून जा.

Beauty of nature | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : कमळाच्या पाकळ्यांसारखी रचना असलेला अभेद्य जलदुर्ग, रायगडला गेल्यावर 'हा' किल्ला नक्की पाहा

Raigad | saam tv
येथे क्लिक करा...