Raigad : कमळाच्या पाकळ्यांसारखी रचना असलेला अभेद्य जलदुर्ग, रायगडला गेल्यावर 'हा' किल्ला नक्की पाहा

Shreya Maskar

रायगड

पद्मदुर्ग किल्ल्याला 'कासा किल्ला' म्हणूनही ओळखले जाते. हा रायगड जिल्ह्यातील मुरुडच्या किनाऱ्यालगत असलेला मराठाकालीन ऐतिहासिक जलदुर्ग आहे.

Raigad | google

पद्मदुर्ग किल्ला

पद्मदुर्ग किल्ला मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधला होता. याचे बांधकाम १६७२-१६७३ च्या सुमारास सुरू झाले आणि १६७६ मध्ये पूर्ण झाले.

Padmadurg Fort | google

किल्ला का बांधला?

छत्रपती शिवाजी महाराज यांनी कोकण किनारपट्टीजवळील एका खडकाळ बेटावर १६७६ मध्ये पद्मदुर्ग किल्ला उभारला. सिद्दींच्या ताब्यात असलेल्या अभेद्य 'मुरुड-जंजिरा' किल्ल्याला आव्हान देण्यासाठी भक्कम नौदल तळ आणि जहाज बांधणी केंद्र म्हणून हा किल्ला बांधला.

Why was the fort built? | google

किल्ल्याचा आकार

पद्मदुर्ग किल्ला त्याच्या बाह्य भिंती आणि बुरूज यांची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की, ते एखाद्या उमललेल्या कमळाच्या फुलाचा आकार आणि पाकळ्यांसारखे दिसतात.

The size of the fort | google

कसं पोहचाल?

मुंबईहून पद्मदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठ भाऊचा धक्का येथून रेवससाठी फेरीने जा आणि त्यानंतर अलिबाग मार्गे राजापुरी जेटी किंवा मुरुड कोळीवाड्यापर्यंत गाडीने प्रवास करा. तिथून, या सागरी किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला स्थानिक मच्छिमाराची खाजगी बोट भाड्याने घ्यावी लागेल.

How will you arrive? | google

रायगडमधील ऐतिहासिक ठिकाणे

रायगड किल्ला, मुरुड-जंजिरा किल्ला, कुलाबा किल्ला, कर्नाळा किल्ला, कोथळीगड किल्ला, पद्मदुर्ग आणि कोरलाई किल्ला, सुधागड किल्ला

Raigad Fort | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : इतिहास अन् अध्यात्माचा अनोखा संगम, साताऱ्याच्या कुशीत वसलाय 'हा' भव्य किल्ला

Satara Fort | SAAM TV
येथे क्लिक करा...