Satara Fort : इतिहास अन् अध्यात्माचा अनोखा संगम, साताऱ्याच्या कुशीत वसलाय 'हा' भव्य किल्ला

Shreya Maskar

सातारा

सज्जनगड किल्ला हा साताऱ्यापासून साधारण १६ किमी अंतरावर असलेल्या सह्याद्रीच्या रांगांमधील ऐतिहासिक डोंगरी किल्ला आहे. सज्जनगड किल्ला, म्हणजे 'चांगल्या लोकांचा किल्ला' असे बोले जाते.

Satara | google

सज्जनगड किल्ला

संत समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरू होते. 3,350 फूट उंचीवर वसलेला हा किल्ला संत समर्थ रामदासांचे अंतिम विश्रांतीस्थान आहे.

Sajjangarh Fort | google

किल्ला कोणी बांधला?

सज्जनगड किल्ला मूळतः १३ व्या आणि १५ व्या शतकांच्या दरम्यान बहामनी सल्तनतीने बांधला होता. नंतर तो आदिलशाही राजवटीच्या नियंत्रणाखाली आला.

Who built the fort? | google

किल्ल्याच्या नावाचा इतिहास

सज्जनगड किल्ला मूळचा 'परळीचा किल्ला' म्हणून ओळखला जात असे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 'सज्जनगड' (सज्जनांचा किल्ला) असे नामकरण केले.

History of the name of the fort | google

किल्ल्याची रचना

सज्जनगड किल्ला हा ९१४ मीटर उंचीवर असलेला टेकडीवरचा किल्ला आहे. सर्व बाजूंनी नैसर्गिक खडक, पायऱ्यांचा मार्ग, दोन मुख्य तटबंदी असलेले प्रवेशद्वार आणि ऐतिहासिक मंदिरे आणि संतांच्या समाधी पाहायला मिळते.

Fort structure | google

ट्रेकिंग स्पॉट

सज्जनगड किल्ल्यावर जाण्यासाठी सुमारे ३०० पायऱ्यांचा मार्ग आहे, जो चढण्यास सोपा ते मध्यम स्वरूपाचा आहे. येथून दरीचे विहंगम दृश्य दिसते.

Trekking spot | google

कसं जाल?

तुम्ही ट्रेनने सातारा रेल्वे स्टेशनला उतरा. तेथून पुढे सज्जनगड किल्ल्यापर्यंत एसटी बस किंवा रिक्षाने प्रवास करा.

how do you go | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

fort | google

NEXT : धबधबे, दऱ्या अन् धुक्याची चादरी, पावसाळ्यात लोणावळ्याला गेल्यावर काय काय पाहावे?

Lonavala | saam tv
येथे क्लिक करा...