shashikant shinde narendra patil welcomes maratha reservation bill  saam tv
मुंबई/पुणे

Maratha Reservation : जरांगेंच्या मनात आजही शंका आहे, सरकारची जबाबदारी वाढली : शशिकांत शिंदे, जरांगेंनी आंदाेलन स्थगित करावे : नरेंद्र पाटील

manoj jarange patil : आजचा मराठा आरक्षणाचा निर्णय मराठा समाजाला फायदेशिर ठरेल असे मत नरेंद्र पाटील यांनी साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केले.

Siddharth Latkar

- सिद्धेश म्हात्रे

Navi Mumbai News :

मराठा आरक्षणासाठी (maratha reservation) झालेल्या विशेष अधिवेशनात सरकारने मराठा समाजाला न्याय दिल्याने आज (बुधवार) माथाडी कामगारांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले. माथाडी भवन येथे बेंजो वाजवत माथाडी कामगारांनी जल्लोष साजरा केला. माथाडी नेते नरेंद्र पाटील (mathadi leader narendra patil), आमदार शशिकांत शिंदे (mlc shashikant shinde) यांच्यासह शेकडो माथाडी कामगारांनी आरक्षण मिळाल्याचा आनंद व्यक्त करत सरकारचे अभिनंदन केले. (Maharashtra News)

आमदार शशिकांत शिंदे म्हणाले सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले परंतु मनाेज जरांगे पाटील यांच्या मनात तफावत आहे. हे आरक्षण टिकणार की नाही याची चिंता त्यांना आहे. आता दिलेले आरक्षण टिकवण्यासाठी सरकारची जबाबदारी वाढली आहे. मनाेज जरांगे- पाटील यांचे आंदाेलन थांबविण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे असेही आमदार शिंदे यांनी नमूद केले.

माथाडी नेते नरेंद्र पाटील म्हणाले सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिल्याने त्यांचे आभार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आरक्षण टिकेल का यावर चर्चा हाेत राहील परंतु त्यांनी आरक्षण दिल्याने आज आनंद हाेत आहे. मनाेज जरांगे-पाटील यांच्या मागणीनंतर कुणबीसाठी माेठी यंत्रणा राबली. राज्यात ठिकठिकाणी कुणबीचे प्रमाणपत्र वाटण्यात आले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ज्यांच्या कुणबी म्हणून नाेंदी सापडल्या नाहीत त्यांना जबरदस्तीने आपण कुणबी देऊ शकत नाही. त्यांना आजचा मराठा आरक्षणाचा निर्णय फायदेशिर ठरेल असे नरेंद्र पाटील यांनी नमूद केले. आता जरांगे-पाटील यांनी त्यांचे आंदाेलन स्थगित करावे असे आवाहन नरेंद्र पाटील यांनी केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bareli Protest : बरेलीत नमाजावेळी मोठा गोंधळ, शेकडो आंदोलक रत्यावर उतरले; पोलिसांचा लाठीचार्ज

Vastu Tips Of Lighting Diya: घरात या दिशेला ठेवू नये पेटता दिवा, ओढवेल मोठं संकट

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

SCROLL FOR NEXT