Sharmila Thackeray
Sharmila Thackeray saam tv
मुंबई/पुणे

Sharmila Thackeray News : ...तर तुमची बायकाेच तुमचे लाेणचे करेल : शर्मिला ठाकरे

चेतन इंगळे

Vasai Virar News : वसई विरारच्या नागरिकांसाठी पाणी मिळावे यासाठी आंदाेलन पुकारलेल्या मनसे नेत्या शर्मिला राज ठाकरे (sharmila raj thackeray) यांनी वेळप्रसंगी कायदा हातात घेऊ परंतु आमच्या हक्काचे पाणी मिळवू असा इशारा सरकारला दिला आहे. शर्मिला ठाकरे यांच्या नेृत्वाखालील आज (शुक्रवार) विरार पूर्व मधील आर.जे. नाका येथे पाण्यासाठी आंदोलन छेडण्यात आले. त्यावेळी ठाकरे बाेलत हाेत्या. (Maharashtra News)

वसई विरार शहराला सुर्या पाणी प्रकल्पातून १८५ दशलक्ष लिटर्स पाणी देण्यात येणार आहे. मात्र जुलै महिन्यापासून हे पाणी रोखून धरण्यात आले आहे. त्याविराेधात मनसेने आज वसई विरार महापालिकेवर महामोर्चा काढला. या माेर्चात शेकडाे मनसैनिक सहभागी झाले हाेते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वसई विरारच्या पाण्यासाठी आयुष्यातली पहिली केस घेण्यासाठी तयार असल्याचे शर्मिला ठाकरे यांनी नमूद केले. त्या म्हणाल्या माझ्यावर आजवर एकही केस नाही. परंतु वसई विरारच्या पाण्यासाठी मी आंदोलन करून पहिली केस घ्यायला तयार आहे.

...तर तुमची बायकाेच तुमचं लाेणचे करेल

सत्तेत बसलेल्या नेत्यांनी त्यांचे घरातील पाणी दाेन दिवस करुन बघा. तुमची बायकाे तुमचेच लाेणचे करेल. महिलांना घरात पाणी नसले तर त्यांना अनेक अडचणींना समाेरे जावे लागते. आठवडाभर वसई विरारमध्ये नागरिकांना पाणी मिळत नाही ही खूप वाईट गाेष्ट असल्याचे ठाकरेंनी नमूद केले.

पाच दिवसांचा अल्टीमेटम

पुढील ५ दिवसांत जर वसई विरार शहराला पाणी दिलं नाही तर आम्ही कायदा हातात घेऊन पाणी सुरू करू असेही ठाकरे यांनी सरकारला ठणकावले. वसई विरार महापालिकेवर पाण्यासाठी आयोजिल्या मोर्चात त्यांनी सरकारला हा इशारा दिला. यावेळी मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासह मनसैनिक उपस्थित हाेते.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Avinash Jadhav: मतांसाठी मराठी आणि गुजरातीचा वाद निर्माण केला; मनसेची ठाकरे गटावर टीका

Maharashatra Election: निवडणूक तोंडावर,ठाकरेंचा शिलेदार तडीपार; सुधाकर बडगुजरांना तडीपारीची नोटीस

Maharashtra Election: महायुतीत दादाविरुद्ध दादा संघर्ष कायम; चंद्रकांत पाटलांकडून पवारांना संपवण्याची भाषा

Maharashtra Politics 2024 : कोल्हापूरच्या विजयासाठी लाखांच्या पैजा; वाढलेल्या टक्क्यानं वाढवली उत्सुकता

PBKS vs RCB: 'विराट' वादळानं RCB चा विजयी चौकार; पंजाब प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर; या संघांचं टेन्शन वाढलं

SCROLL FOR NEXT