Share Market : शेअर ब्रोकरने पैसे बुडवले; गुंतवणूकदाराकडून ब्रोकरचे अपहरण! SaamTVNews
मुंबई/पुणे

Share Market : शेअर ब्रोकरने पैसे बुडवले; गुंतवणूकदाराकडून ब्रोकरचे अपहरण!

शेअर ब्रोकरने पैसे बुडवल्याने एका गुंतवणूकदार ज्वेलर्स मालकाने अपहरण केल्याची घटना बोरिवलीमध्ये घडली.

सूरज सावंत

मुंबई : शेअर मार्केटमध्ये गेलेल्या गुंतवणूकीत नुकसान झाल्याने एका ज्वेलर्स मालकाने शेअर ब्रोकरचेच अपहरण केल्याची घटना बोरिवलीत घडली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच शर्तीचे प्रयत्न करून पोलिसांनी अवघ्या एका तासात या ब्रोकरची (Broker) सुटका करून आरोपीला गजाआड केलं आहे. अपहरण कर्त्याचे सीसीटिव्ह सध्या सोशल मिडियावर वायरल होतं आहे. बोरिवली (Borivali) पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहणारे प्रियांक लखानी हे शेअर ब्रोकरचं काम करतात.

हे देखील पहा :

आरोपी अक्षय सुराणाने प्रियांककडे गुंतवणुकीसाठी पैसे दिले होते. हे पैसे (Money) बुडाल्याने अक्षय हा लखानीकडे पैशा़ची मागणी करत होता. मात्र, लखानीकडे पैसे नसल्याने तो ती रक्कम परत करू शकत नव्हता. २८ जानेवारीला अक्षय त्याच्या मित्राना घेऊन सत्यानगर येथील भगवती हाॅटेलजवळ आला. तेथे लखानीला त्याने जबरदस्ती गाडीत बसवून नेले. या घटनेचे CCTV फुटेज आता समोर आले आहेत. गाडीत जबरदस्ती बसवून अक्षय लखानीला घेऊन आरोपी जे एस टर्स फुटबाॅल ग्राऊड, बोरिवली आयसी काॅलनी येथे आला.

जो पर्यंत ३ लाख रुपये परत करत नाही तो पर्यंत लखानीला सोडणार नाही अशी धमकी त्याने दिली. प्रियांकचे अपहरण झाल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांना कळल्यानंतर प्रियांकच्या नातेवाईकांनी बोरिवली पोलिस (Police) ठाणे गाठत तक्रार नोंदवली. तक्रार मिळताच पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली. पोलिसांनी सीसीटिव्ही आणि तांत्रिक दृष्ट्या तपास करून लखानी आणि अक्षय यांचा ठाव ठिकाणा शोधून काढत प्रियांकची सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी अक्षय याला अटक करून त्याच्यावर ३६४ (अ), ३८७ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी बोरिवली पोलिस अधिक तपास करत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT