Sharad Pawar Vs Ajit Pawar: अजित पवाराच्या गटात मोठं खिंडार पडणार? आजी-माजी १६ नगरसेवक शरद पवार यांच्या भेटीला
Sharad Pawar Vs Ajit Pawar saam tv
मुंबई/पुणे

Sharad Pawar Vs Ajit Pawar: अजित पवारांच्या गटात मोठं खिंडार पडणार? आजी-माजी १६ नगरसेवक शरद पवार यांच्या भेटीला

Bharat Jadhav

अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या १६ नगरसेवकांनी शरद पवार यांची भेट घेतलीय. या नगरसेवकांनी पुण्यातील मोदीबागेत शरद पवार यांची भेट घेतील. तर अजित पवार राष्ट्रवादीचे नेते विलास लांडेंनीही शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती आहे. सर्व नगरेसवकांचा येत्या ५ जुलैला शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश होण्याची शक्यता आहे.

दरम्यान पिंपरी-चिंचवड महापालिकेचे 36 आजी-माजी नगरसेवकही शरद पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. त्यामुळे अजित पवारांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या पुण्यातच शरद पवार त्यांना पुन्हा एकदा धोबीपछाड देण्याची शक्यता आहे.

लोकसभेत पराभव केल्यानंतर शरद पवार पुन्हा एकदा अजित पवार गटाला दणका देणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेले शरद पवार अजित पवार गटाला तडा देणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार हे अजित पवार यांच्या बाल्लेकिल्ला असलेल्या पिंपरी -चिंचवडला सुरूंग लावणार आहेत. लोकसभेत बारामती काबीज करणाऱ्या अजित पवारांच्या अॅक्शन शरद पवार यांची ही रिअॅक्शन असल्याचं म्हटलं जात आहे.

लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान निलेश लंके आणि बजरंग सोनावणे यांना गळाला लावत शरद पवार यांनी अजित पवार यांना चेकमेट दिलं होतं. लंके आणि सोनावणे यांनी सोडचिठ्ठी दिल्यानंतर अजित पवार यांनी या दोन्ही उमेदवारांविरोधात जोरदार सभा घेतल्या होत्या. प्रत्येक सभांमध्ये त्यांची भाषणांची चर्चा झाली होती. तरीही शरद पवारांच्या करिष्माने दोन्हीही उमेदवार निवडून आलेत. लोकसभेच्या पराभवानंतर महायुतीमध्ये अजित पवारांच्याविरोधात चर्चा सुरू आहे, त्याचदरम्यान कोल्हापूरचे माजी आमदार केपी पाटील आणि ए वाय पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती.

त्यानंतर आता पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आजी-माजी नगरसेवकांनी शरद पवार यांची भेट घेत शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं म्हटलं जात असल्याने अजित पवार गोटात अस्वस्थता वाढलीय. पिंपरी- महापालिकेच्या हद्दीतील दोन मतदारसंघावर अजित पवार यांचे वर्चस्व आहे. मावळ आणि पिंपरीमध्ये अजित पवार यांचं वर्चस्व आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya : आज 'या' राशींच्या लोकांना हवं ते मिळेल, वाचा राशीभविष्य

Weekly Horoscope: आजपासून या 5 राशींचे येणार अच्छे दिन, 7 दिवस प्रत्येक गोष्टीत मिळेल यश

IND Vs ZIM: रिंकू सिंहचा षटकार पाहून डोक्याला लावाल हात; मुझारबानीच्या चेंडूला पाठवलं थेट मैदानाबाहेर, Video

Who Is Mihir Shah: वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहा कोण आहे? BMW ने महिलेला उडवलं, अद्यापही आहे फरार

Gujarat Bus Accident: सापुतारा घाटात भीषण अपघात; 70 पर्यटकांना घेऊन जाणारी बस कोसळली दरीत

SCROLL FOR NEXT