राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन दिवसांपासून ते या रुग्णालयात उपचार घेत असून त्यांच्या भेटीसाठी आणि प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांचे नेते रुग्णालयात येत आहेत. शरद पवार यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह सर्व नेते प्रार्थना करत आहेत. अशातच शरद पवारांना डिस्चार्ज कधी मिळणार? याबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. ब्रीच कँडी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीचे अपडेट आणि डिस्चार्जबद्दल सांगितले.
शरद पवार यांना उद्या ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. तब्येतीत सुधारणा झाल्यामुळे शरद पवार उद्या घरी परतणार आहेत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर शिवसेना ठाकरेसेनेचे नेते उद्धव ठाकरे मुंबईतील 'सिल्वर ओक' निवासस्थानी जाऊन शरद पवारांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करणार आहेत. या भेटीदरम्यान राजकीय घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुरूवारी रात्री आणि शुक्रवारी दिवसभरात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनात शिंदे, संजय राऊत, प्रफुल्ल पटेल, अनिल देसाई, बाळासाहेब थोरात आणि जयंत पाटील या नेत्यांनी रुग्णालयात जाऊन शरद पवारांची भेट घेतली.
शरद पवारांवर उपचार करणाऱ्या ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, 'शरद पवारांची प्रकृती आधीपेक्षा चांगली आहे. त्यांना पहिल्यापेक्षा उत्तम वाटत आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ते उपचाराला योग्य प्रतिसाद देत आहेत.' शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे आता त्यांना लवकरच डिस्चार्ज दिला जाणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांच्या प्रकृतीविषयी महत्वाची अपडेट दिली. ते म्हणाले की, 'शरद पवारांना मी रुग्णालयात भेटून आलो. त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. सुप्रिया सुळेही त्याठिकाणी उपस्थित होत्या. माझी डॉक्टरांसोबतही चर्चा झाली. पवारसाहेबांची तब्येत आता उत्तम आहे. त्यांना उद्या डिस्चार्ज दिला जाईल. आता चिंता करण्याची काहीही गरज नाही. डॉक्टरांनीही उद्या डिस्चार्ज होईल असं सांगितलं आहे.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.