Sharad Pawar News saam tv
मुंबई/पुणे

Sharad Pawar Threat Case: शरद पवार धमकी प्रकरण, आरोपी सागर बर्वेची न्यायालयीन कोठडीत रवानगी

Sagar Barve Judicial Custody: शरद पवारांना धमकी देणाऱ्या सागर बर्वेला रविवारी पुण्यातून अटक करण्यात आली होती.

Priya More

सचिन गाड, मुंबई

Mumbai News: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar Threat) यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या सागर बर्वेची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. अटकेनंतर सागर बर्वेला तीन दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली होती. आज त्याला कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने 28 जूनपर्यंत त्याला न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावली आहे. आरोपी सागर बर्वे हा जामीनासाठी अर्ज करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

शरद पवारांना धमकी देणाऱ्या सागर बर्वेला रविवारी पुण्यातून अटक करण्यात आली होती. सागर आयटी इंजिनिअर आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याच्याविरोधात कारवाई करत अटक केली होती. अटक केल्यानंतर त्याला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्याची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज त्याची रवानगी 28 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा तपास करत असताना धक्कादायक माहिती समोर आली. आरोपी सागर बर्वेने नैराश्येतून शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा पोलिसांना संशय आहे. 34 वर्षांचा सागर बर्वे हा पुण्यात राहणारा आहे. त्याचे लग्न होत नसल्याने आणि सध्याच्या महाराष्ट्रातील परिस्थिनीमुळे तो नैराश्येमध्ये होता. औरंगजेबाच्या उदात्तीकरणाने देखील तो व्यथित होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. सध्या या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

सागरने एका ट्विटर हँडलवरुन आणि फेसबुकवरील पोस्टच्या माध्यमातून शरद पवार यांना धमकी दिली होती. सागर बर्वेने फेसबुकवर 'नर्मदाबाई पटवर्धन' नावाने पेज तयार केले होते. त्याने या फेसबुक पेजवरुन शरद पवार यांना उद्देशून ‘तुमचा लवकरंच दाभोळकर होणार...’, अशी धमकी त्याने दिली होती. यासोबतच सौरभ पिंपळकर नावाच्या ट्विटर हँडलवरुनही आक्षेपार्ह भाषा वापरून पोस्ट करण्यात आली होती. या पोस्टमध्ये शरद पवार यांची तुलना औरंगजेबाशी करणारा मजकूर पोस्ट करण्यात आला होता. या धमकी प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नो पार्किंग क्षेत्रात कॅबिनेट मंत्र्याची कार; पोलिसांनी क्रेनने उचलून नेली, व्हिडिओ व्हायरल

HSRP नंबरप्लेटसंदर्भात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, वाहनधारकांना दिलासा; 'या' तारखेपूर्वी करा काम

Nandurbar : चांदसैली घाटात दरड कोसळली; थोडक्यात दुर्घटना टळली

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Heart blockage symptoms:हार्ट ब्लॉकेज झाल्यावर शरीरात दिसतात ६ मोठे बदल; तुम्हालाही त्रास होत असेल तर सावध व्हा

SCROLL FOR NEXT