Sharad Pawar News Saam tv
मुंबई/पुणे

Sharad Pawar : अजित पवारांना इतक्या वर्षांत कधी भाऊ-बहीण आठवले नाहीत; लाडक्या बहीण योजनेवरून शरद पवारांचा टोला, Video

Sharad Pawar News in Marathi : लाडक्या बहीण योजनेवरून अजित पवारांनी शरद पवारांना जोरदार टोला लगावला आहे. अजित पवारांना इतक्या वर्षांत कधी भाऊ-बहीण आठवले नाहीत,असं म्हणत शरद पवारांनी अजित पवारांना टोला लगावला.

Vishal Gangurde

पुणे : राज्यभरात लाडक्या बहीण योजनेची जोरदार चर्चा आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला वर्गांकडून सेतू कार्यालयावर एकच गर्दी होत आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांचा मासिक १५०० रुपये मिळणार आहे. या योजनेवरून विरोधकांची सत्ताधाऱ्यावर टीका देखील सुरु आहे. अजित पवारांनी अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली. याच योजनेवरून शरद पवारांनी अजित पवारांना टोला लगावला.

पुण्यातील पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी लाडक्या बहीण योजनेवरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. शरद पवार म्हणाले, 'लाडकी बहीण, लाडका भाऊ या योजना अलीकडच्या बजेटमध्ये पाहिल्या. अजित पवार इतके वर्ष अर्थमंत्री आहेत. त्यांना इतक्या वर्षात भाऊ बहीण कधी आठवली नाहीत'.

'लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा हा सर्व परिणाम आहे. मला यात राज्याच्या आर्थिक स्थितीची काळजी आहे. सध्या राज्याची आर्थिक स्थिती सध्या काही ठीक दिसत नाही. राज्यावरील कर्जाचा विचार व्हायला हवा, असेही शरद पवारांनी पुढे सांगितले.

छगन भुजबळ यांच्या भेटीवर भाष्य करताना शरद पवार म्हणाले, 'छगन भुजबळ यांची अलीकडची दोन-तीन भाषणे चांगली झाली आहेत. ते मला दोन-तीन विषयांवर बोलले. मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली होती. मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्र्यांचा संयुक्त कार्यक्रम पाहिला आहे. त्याचा काहीतरी डायलॉग होता. ओबीसींचे आंदोलन सोडवण्यासाठी चार-पाच मंत्री गेले होते. या दोन्ही ठिकाणी काय ठरले, जरांगे आणि ओबीसींना काय आश्वासन दिले हे जाहीर होत नाही. तोपर्यंत बैठकीला जाण्यात अर्थ नाही.

'भुजबळांनी सांगितले की, झाले गेले सोडून द्या, काहीतरी मार्ग काढायला हवा. शातंता निर्माण करण्यासठी तुमची गरज असल्याचं मार्गदर्शन छगन भुजबळ यांनी केले आहे', असेही ते म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily Horoscope: आजचा शुभ दिवस देणार बरंच काही; वाचा तुमचे राशीभविष्य

Chhagan Bhujbal: बात निकली है, तो बहोत दूर तक जाएगी; छगन भुजबळ यांचे शरद पवारांना प्रत्युत्तर

PM Modi: महाराष्ट्रातील निवडणुकीत कर्नाटकातील घोटाळ्यांच्या पैशांचा वापर, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर आरोप

News Explainer : राजकारणातून काकांचे निवृतीचे संकेत, पुतण्याने हेरली संधी? VIDEO

Raj Thackeray: भविष्यातल्या महाराष्ट्राला देवच वाचवू शकतो; चांदीवलीत राज ठाकरे असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT