Sharad pawar, Eknath Shinde Saam TV
मुंबई/पुणे

Dasra Melava : अखेर दसरा मेळाव्याबाबत शरद पवारांनी दिला मुख्यमंत्र्यांना सल्ला (पाहा व्हिडिओ)

दसरा मेळाव्यावरुन आज राज्यातील राष्ट्रवादीच्या दाेन्ही प्रमुख नेत्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं.

साम न्यूज नेटवर्क

- रश्मी पुराणिक

Dasra Melava : मेळावे घेण्याचे अधिकार सगळ्यांना आहेत पण त्यातून वाद निर्माण हाेतील अशी भुमिका नसावी. सामाेपचारानं गाेष्टी हाेतील याकडं लक्ष देणे गरजेेचे असल्याचे मत ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केले. दसरा मेळाव्यावरून (dasra melava) सध्या राज्यात वाद सुरु आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदाचा सेनेचा दसरा मेळावा आम्ही घेणार आहाेत असं जाहीर केले आहे. त्यामुळे शिवसैनिकांमधील दाेन गटात पुन्हा संघर्ष हाेण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. या पार्श्वभुमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघर्षाची भूमिका न घेता सर्वसमावेशक भूमिका घेतली पाहिजे. त्यांनी सामोपचाराने गोष्टी होईल याकडे लक्ष द्यावे असा सल्ला देखील पवारांनी दिला आहे.

दरम्यान विराेधी पक्ष नेते अजित पवार यांनी देखील दसरा मेळाव्याबाबत आज नगर येथे वक्तव्य केले. शिवतीर्थ मैदानासंदर्भामध्ये बोलताना अजित पवार म्हणाले दोघांनाही दसरा मेळाव्यासाठी परवानगी मागण्याचा अधिकार आहे. वर्षानुवर्ष महाराष्ट्रातील जनता पाहत होती की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे शिवतीर्थावरच दसरा मेळावा घ्यायचे.

याच शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की ही शिवसेना यापुढे उद्धव ठाकरे पाहतील. मात्र सध्याच्या राजकीय घडामोडी घडल्यात ते सगळ्यांनी पाहिलं आहे. ज्यांच्या हातात सत्ता असते ते त्यांना पाहिजे त्या पद्धतीने निर्णय घेतात. दाेघांचे कार्यक्रम हाेतील पण निवडणुका झाल्यानंतर लक्षात येईल खरी शिवसेना कोणाची असंही अजित पवार यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT