भारतीय बास्केटबाॅल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अर्निका गुजर - पाटील; महाराष्ट्रात जल्लाेष

अर्निका गुजर पाटील साता-यातील बास्केटबाॅलचे जनक (कै.) रणजीत गुजर यांच्या कन्या असून राेहित पाटील यांच्या पत्नी आहेत. आंतरराष्ट्रीय बास्केटबाॅलपटू म्हणून त्यांची ख्याती असून सातारा इंग्लिश मीडियम स्कूलच्या त्या अध्यक्षा आहेत.
Arnika Gujar - Patil
Arnika Gujar - Patilsaam tv

Arnika Gujar Patil : येत्या पाच ते अकरा सप्टेंबर या कालावधीत बंगळुर येथे हाेणा-या (FIBA ​​U18) महिला आशियाई अजिंक्यपद बास्केटबाॅल (basketball) स्पर्धेसाठी बास्केटबाॅल फेडरेशन Of इंडियाने (BFI) भारतीय संघाची घाेषणा केली. या संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अर्निका गुजर - पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अर्निकाच्या निवडीनंतर महाराष्ट्रासह साता-यातील क्रीडाप्रेमींनी (sports) फटाके फाेडून जल्लाेष केला.

या स्पर्धेत अ गटात चीन, जपान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया, न्यूझीलंड, चायनीज तैपेई, इंडोनेशिया आणि भारत हे देश असणार आहेत. तसेच ब विभागामध्ये मलेशिया, थायलंड, हाँगकाँग, सामोआ, मालदीव, जॉर्डन, मंगोलिया आणि फिलिपाइन्स हे देश असणार आहेत.

Arnika Gujar - Patil
Anand Remake: आनंद मरा नहीं, आनंद मरते नहीं..; रुपेरी पडद्यावर पुन्हा येताेय 'आनंद'

बीएफआयने स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. त्याबाबतचे ट्विट देखील बीएफआयने केले आहे. भारतीय संघात नितिका अमुथन, दीप्ती राजा, सत्या कृष्णमूर्ती, मेखला गौडा, करणवीर कौर, कीर्ती देपली, मनमीत कौर, इरिन एल्सा जॉन पुथेनोराकल, यशनीत कौर, निहारिका रेड्डी मेकापती, भूमिका सिंग, हरिमा सुंदरी मुनीष्कन्नन यांचा समावेश आहे.

head coach arnika gujar along with team india
head coach arnika gujar along with team indiasaam tv

या संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अर्निका पाटील, प्रशिक्षकपदी अनिथा पॉल दुराई, व्यवस्थापकपदी जरीन पीएस तसेच फिजिओथेरपिस्ट म्हणून अहाना पुराणिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Arnika Gujar - Patil
Kolhapur: पॅव्हेलियन ग्राऊंडच्या विकासासाठी कटीबद्ध : पालकमंत्री सतेज पाटील

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com