Kolhapur: पॅव्हेलियन ग्राऊंडच्या विकासासाठी कटीबद्ध : पालकमंत्री सतेज पाटील

रविवारी काेल्हापूरात झाले बास्केटबाॅल मैदानाचे उदघाटन.
kolhapur
kolhapursaam tv
Published On

काेल्हापूर : पॅव्हेलियन ग्राऊंडच्या ('Pavilion Ground' in Kasba Bawda) विकासासाठी तसेच इथे कोल्हापुरातील खेळाडूंना अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहाेत असे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. कसबा बावड्यातील 'पॅव्हेलियन मैदान' येथे साकारलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बास्केटबॉल मैदानाचे उदघाटन आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक व बास्केटबॉल खेळाडू अर्निका गुजर- पाटील (international coach and basketball player Arnika Gujar) यांच्या हस्ते व आमदार ऋतुराज पाटील (ruturaj patil) यांच्या उपस्थितीत नुकतेच झाले. अध्यक्षस्थानी असलेले काेल्हापूर (kolhapur) जिल्हा बास्केटबाॅल (basketball) संघटनेचे प्रमुख संघटक पालकमंत्री सतेज पाटील (satej patil) यांनी यावेळी खेळाडूंना साेयी सुविधा देण्यासाठी कटीबद्ध असल्याचं म्हटलं. (Basketball Latest Marathi News)

बास्केटबाॅल मैदानाचे उदघाटन करताना अर्निका गुजर. त्यावेळी सतेज पाटील.
बास्केटबाॅल मैदानाचे उदघाटन करताना अर्निका गुजर. त्यावेळी सतेज पाटील. Saam Tv

मंत्री सतेज पाटील म्हणाले पॅव्हेलियन ग्राऊंडच्या विकासासाठी तसेच इथे कोल्हापुरातील खेळाडूंना अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. याचसोबत, डीपीडीसी मधून दीड कोटी रुपये मिळणार आहेत ते मिळाल्यानंतर ग्राऊंडवरील उर्वरित राहिलेली विकास कामे सुद्धा लवकरच पूर्ण केली जाणार आहेत.

खेळाडूंना मार्गदर्शन करताना अर्निका गुजर (arnika gujar).
खेळाडूंना मार्गदर्शन करताना अर्निका गुजर (arnika gujar).saam tv

पाटील पुढं म्हणाले ग्राऊंडवरील सोयींमुळे येथे चांगले खेळाडू निर्माण होण्यास नक्कीच मदत होणार आहे. कोल्हापूरच्या क्रीडा परंपरेला साजेसे असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान तयार करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

यावेळी आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक व बास्केटबॉल खेळाडू अर्निका गुजर- पाटील यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन केले. त्यानंतर या मैदानावर प्रदर्शनीय सामना खेळवण्यात आला.

Edited By : Siddharth Latkar

kolhapur
Stephen Curry : एनबीए त 3 पॉइंटर्सचा विक्रम स्थापित (पहा Video)
kolhapur
Sambhajiraje Chhatrapati: मी जर लिस्ट काढली तर सरकार अडचणीत येईल : खासदार संभाजीराजे छत्रपती
kolhapur
Kolhapur: देशातील ९०० स्पर्धकांतून साता-याचे डाॅ. सुधीर पवार ठरले 'बर्गमॅन'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com