Jayant Patil  Saam Tv
मुंबई/पुणे

Jayant Patil On Sharad Pawar: 'साहेब नसल्यास पक्षात न्याय मिळेल की नाही याची कार्यकर्त्यांना भीती', जयंत पाटलांनी सांगितलं पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचे कारण

Sharad Pawar Retirement: पवारांच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते राजीनामे देत आहे. त्यांच्या राजीनाम्याचे सत्र सुरुच आहे.

Priya More

Mumbai News: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी अध्यक्ष पदावरुन पायउतार होण्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांना मोठा धक्का बसला. पवारांच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते राजीनामे देत आहे. त्यांच्या राजीनाम्याचे सत्र सुरुच आहे.

हे सर्वजण राजीनामे का देत आहेत यामागचे कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले आहे. 'पवारसाहेब नसतील तर पक्षात आपल्याला न्याय मिळेल की नाही याची भीती त्यांना वाटत आहे. म्हणून ते राजीनामा देत आहेत.', असे जयंत पाटील यांनी सांगितले.

जयंत पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, 'आमचे नेते निराश झाले आहेत. माझ्याकडे आणि पक्षकार्यालयाकडे अनेक जणांचे राजीनामे आले आहेत. माझ्या संपर्कात ज्यांचे मोबाईल नंबर आहेत त्यांचे राजीनामे आले आहेत. तर काहींना पक्षकार्यालयाकडे राजीनामे पाठवले आहेत. शरद पवार नाहीत म्हणून हे सर्वजण नाराज झाले आहेत. राजीनामा देऊन पवारसाहेब नसतील तर पक्षात न्याय मिळेल का? अशी भावना अनेकांची व्यक्त केली. या भीतीपोटी राजीनामा दिले जात आहेत.'

यावळे शरद पवार हे आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. 'पवारसाहेबांनी निर्णय जाहीर केला आहे. त्यांच्या मतापासून ते बाजूला गेलेले नाहीत. त्यांची भूमिका कायम दिसते. अनेक कार्यकर्ते साकडे घालत आहेत. त्यांनी निर्णय घेऊ नये असा आग्रह केला जात आहे. देशातील राज्यातील अध्यक्ष हेच सांगत आहेत. पण शरद पवार आपल्या निर्णयावर ठाम दिसत आहे.', असं देखील त्यांनी यावेळी सांगितले.

'महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून मला 2024 विधानसभा निवडणुकीची काळजी आहे. त्यामुळे शरद पवारांनी तोपर्यंत अध्यक्ष राहावे. ते योग्य न्याय करतात.', अशी विनंती जयंत पाटील यांनी केली आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर राष्ट्रवादीच्या जवळपास सर्वच नेत्यांना राजीनामा मागे घेण्याची मागणी केली. मात्र शरद पवार आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं बोललं जात आहेत. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला. त्यांच्यासोबत ठाण्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी देखील राजीनामे दिले होते. तर राज्यभरातून देखील अनेक पदाधिकारी राजीनामे देत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपची नवी मुंबईत गेमचेंजर खेळी; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांची मोठी घोषणा

RR vs CSK highlights : आरआर खतरनाक! चेन्नईच्या धुरंधरांना केलं गारद, राजस्थानने दिली विजयी सलामी

Pakistan: दुसऱ्यांच्या भांडणात पाकची नाचक्की, युद्ध थांबलं नाही तर हाती कटोरा घेण्याची वेळ

शानदार, जबरदस्त…! वैभव सूर्यवंशी चमकला, अवघ्या १५ चेंडूत अर्धशतक ठोकलं

Ashok Kharat: भोंदूबाबा खरातच्या मोबाईलमध्ये २५०० कोडवर्ड, हजारो VIP चे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT