Sharad Pawar Saam tv
मुंबई/पुणे

Sharad Pawar : माझा आणि मनोज जरांगे यांचा काडीमात्र संबंध नाही; देवेंद्र फडणवीसांचे आरोप शरद पवारांनी फेटाळले

Sharad Pawar Latest Marathi News : देवेंद्र फडणवीसांचे आरोप फेटाळत माझा आणि मनोज जरांगे यांचा काडीमात्र संबंध नाही, असं स्पष्टीकरण नॅशनलिस्ट काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलं

Vishal Gangurde

सचिन जाधव, पुणे

Sharad Pawar News :

मनोज जरांगे यांच्या आरोपांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे यांनी मला संपवण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव असा आरोप केला. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे हे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची स्क्रिप्ट बोलत आहेत, असा आरोप केला. देवेंद्र फडणवीसांचे आरोप फेटाळत माझा आणि मनोज जरांगे यांचा काडीमात्र संबंध नाही, असं स्पष्टीकरण नॅशनलिस्ट काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलं. ते पुण्यात बोलत होते. (Latest Marathi News)

शरद पवार आज मंगळवारी पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत आगामी निवडणुकीवर शरद पवार म्हणाले, 'सगळे राष्ट्रीय पक्ष लोकसभा कामाला लागले आहेत. मविआ सोबत आम्ही एकत्रित निवडणूक लढवणार आहोत. काही अजून पक्ष आहेत. आम्ही एकत्रित येऊन पर्याय देत आहोत. प्रकाश आंबेडकर यांनी पण आमच्या सोबत यावं असा आग्रह आहे. त्यांच्याशी बोलणं सुरू आहे. आज त्यांची पुण्यात सभा आहे. त्यांमुळे आज आंबेडकर चर्चेला आले नाहीत. लोकांना पर्याय हवा आहे'.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'आम्ही सकाळपासून बारामती लोकसभेचा आढावा घेत आहोत. महाराष्ट्रातील सर्वसामान्य मतदाराला पर्याय हवा आहे, अस कळलं. त्याची पूर्तता करण्यासाठी आम्ही एकत्रित लढत आहोत. कोणाला दमदाटी केली जात असेल तर आमचे कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी आहेत, असे ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना म्हटलं की, 'जबाबदार लोक असे पोरकट बोलतात. मनोज जरांगे आणि माझा संबंध नाही. त्यांचा उपोषण सुरु झालं, तेव्हा भेटलो. त्यांच्या मागण्यासाठी पाठिशी आहोत. दोन समाजात काही होईल असं वागू नका. एवढ बोलणं झालं. आज अखेर त्यांच्याशी मनोज जरांगेंशी काही बोलणं झालं नाही. राजेश टोपे यांच्यावर आरोप केले जात आहेत, ते पण चुकीचं आहे. एसआयटी नेमा अजून काही नेमा. डर नाही, त्याला कर कशाला... माझ्या मोबाईलवरून फोन केला नाही'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Mushroom Masala: अवघ्या काही मिनिटात तयार करा झणझणीत आणि चवदार मशरूम मसाला

ड्रम निळ्या रंगाचाच का असतो?

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT