Maratha Aarakshan News: मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट; राज्यात आरक्षणाची अंमलबजावणी २६ फेब्रुवारीपासून लागू होणार, सरकारकडून राजपत्र जारी

Maratha Reservation Update News: शिंदे सरकारने विशेष अधिवशेनात मराठा समाजाला १० टक्के आरक्षण घोषित केले आहे. या आरक्षणाची अंमलबजावणी २६ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे.
Maratha Aarakshan News and Update: Maratha Reservation Implementation will be from 26 February
Maratha Aarakshan News and Update: Maratha Reservation Implementation will be from 26 FebruarySaam Tv
Published On

Maratha Aarakshan Update:

मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट हाती आली आहे. राज्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी लावून धरली आहे. तर दुसरीकडे शिंदे सरकारने विशेष अधिवशेनात मराठा समाजाला १० टक्के आरक्षण घोषित केले आहे. या आरक्षणाची अंमलबजावणी २६ फेब्रुवारीपासून होणार आहे. याबाबत शासन निर्णयासह राजपत्र जारी करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

काही दिवसांपूर्वी घेण्यात आलेल्या विशेषअधिवेशनात मराठा आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आलं. त्यानंतर कायदा आणि न्यायपालिका विभागाचे सचिव सतीश वाघोले यांच्या सहीनंतर आरक्षणाचे विधेयकाचं कायद्यात रुपांतर झालं. SEBC या गटामध्ये मराठा आरक्षण देण्यात आलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maratha Aarakshan News and Update: Maratha Reservation Implementation will be from 26 February
Supreme Court: सरकार डोळे बंद करून बसलंय? पतंजली आयुर्वेदच्या जाहिरातींवरून सर्वोच्च न्यायालयाने सरकारला झापलं

कायदा आणि न्यायपालिका विभागाचे सचिव सतीश वाघोले यांच्या सहीनंतर आता राज्य सरकारने राजपत्र जाहीर केले आहे. यामुळे आता राज्यात २६ फेब्रवारीपासून मराठा आरक्षण लागू होणार आहे.

Maratha Aarakshan News and Update: Maratha Reservation Implementation will be from 26 February
Manoj Jarange Patil | एसआयटी चौकशीच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील यांचं उत्तर | Marathi News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

'मला आनंद आहे. मी शपथ घेतली. मराठा समाजाला आरक्षण लागू झालं. जीआर निघाला. या आरक्षणाचा मराठा तरुणांना नोकरी आणि शिक्षणात फायदा होईल. याचं मला समाधान आहे. या निर्णयाचा फायदा मराठा समाजाने घ्यावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने बोललो,ते पूर्ण केलं,असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

'मला कोणत्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण दिल्याचा आनंद आहे, असेही शिंदे म्हणाले.

Maratha Aarakshan News and Update: Maratha Reservation Implementation will be from 26 February
Maratha Reservation News | मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सुरूवात, राज्यात आरक्षण लागू | News

मराठा आरक्षणावर भाजप प्रदेशाध्यक्ष काय म्हणाले?

मराठा आरक्षणावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. '१० टक्के आरक्षण दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन आणि आभार. आरक्षण देताना फडणवीसांनी शब्द दिला होता की ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लागू देणार नाही, तो शब्द त्यांनी खरा करून दाखवला'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com