राज्यात शरद पवार पुन्हा राजकीय भूकंप घडवणार? अजितदादांच्या आमदारांना पक्षात मिळणार एण्ट्री?
Sharad Pawar Vs Ajit Pawar Saam Digital
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : राज्यात शरद पवार पुन्हा राजकीय भूकंप घडवणार? अजितदादांच्या आमदारांना पक्षात मिळणार एण्ट्री?

Vinod Patil

मुंबई : विधानसभेपूर्वी शरद पवार अजितदादांना धक्का देण्याच्या तयारीत आहेत. सोडून गेलेल्या सर्वच आमदारांना आपल्या पक्षात प्रवेश बंदी नाही, असं पवारांनी सांगितलं आहे. त्यामुळे अजितदादांचं टेंशन वाढलंय. त्यामुळे शरद पवारांनी टाकलेल्या या गुगलीमुळे राजकीय भूकंपाची चर्चा सुरू झाली आहे.

शरद पवारांनी आपले डावपेच बदलले आहेत. राजकारणात धक्का देण्याची खासियत असलेल्या शरद पवारांनी आता आपले डावपेच बदलले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार हे अजित पवारांचं टेंशन वाढवणार आहेत. कारण पवार अजित पवारांच्या आमदारांसाठी आपल्या पक्षाची दारं खुली करणार आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवारांनी पक्ष सोडून गेलेल्या आमदारांना पुन्हा एण्ट्री नाही असं जाहीर केलं होतं. त्यामुळे अजित पवारांना आमदार सांभाळण्याचं तेवढं टेंशन नव्हतं. मात्र अचानक पवारांनी आपले डावपेच बदलले आहेत. अजितदादांसोबत गेलेल्या सर्वच आमदारांना प्रवेशबंदी नसल्याचं शरद पवारांनी सांगितलंय.

काही आमदार याला अपवाद असतील असं पवारांनी सांगितलंय. त्यामुळे अजित पवारांचं चांगलच टेंशन वाढलंय. मात्र पवारांनी केवळ संभ्रम निर्माण करण्यासाठी हे विधान केल्याचा दावा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी केला आहे.

लोकसभेतलं यश आणि आगामी विधानसभा निवडणुकीत नव्या चेह-यांना संधी देणार असल्याचं पवारांनी सांगितल्यामुळे राष्ट्रवादीतल्या दुस-या फळीत उत्साहाचं वातावरण आहे. मात्र आता पवारांनी गुगली टाकत अजितदादांच्या आमदारांनाही दारं खुली असल्याचं सांगितल्यामुळे केवळ अजित पवारांच्या आमदारांमध्येच नव्हे तर संधीची अपेक्षा असलेल्या पवारांच्याही पक्षातले काहीजण नक्कीच अस्वस्थ झाले असतील. मात्र शरद पवारांच्या या गुगलीमुळे सर्वाधिक टेंशन अजितदादांचंच वाढलं असेल हे मात्र नक्की.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीची सध्या किती ताकद आहे ते पाहूयात...

विधानसभेत अजित पवारांचे 40 आमदार आहेत. तर शरद पवारांचे 13 आमदार आहेत. लोकसभेत अजित पवारांचा एकच खासदार आहे. तर पवारांचे 8 खासदार आहेत. विधानपरिषदेत अजितदादांकडे 5 आमदार आहेत. तर पवारांकडे 2 आमदार आहेत. राज्यसभेत अजित पवारांकडे दोन खासदार असून शरद पवारांकडेही दोन खासदार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Live News Updates : फुकटचे निर्णय हिताचे नसतात त्याचा गैरवापर होतो, शरद पवारांची सरकारवर टीका

Bigg Boss OTT 3 : "अरमान मलिकची बिग बॉसमधून हकालपट्टी करा", विशाल पांडेचे आई-वडील संतापले; नेमकं काय घडलं?

Mumbai VIDEO: मुंबईतील विमानसेवा पुर्वपदावर, इतर ठिकांनी वळवलेली विमानसेवा पुन्हा मुंबईत

Oil Free Recipes : सकाळी तेलकट नाश्ता नको; मग ही ऑईल फ्री रेसिपी नक्की ट्राय करा

Palghar Accident: रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी धाडकन आदळली; दीड वर्षाचा चिमुकला आईच्या हातातून निसटला, जागेवर झाला मृत्यू

SCROLL FOR NEXT