MNS VIDEO: विधानसभेसाठी राज ठाकरे मैदानात, 20 जुलैपासून राज्याचा दौरा; मनसेची स्वबळाची तयारी?

Raj Thackeray News: लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीसाठी आता सारेच पक्ष सज्ज झाले आहेत. त्यातही मनसेच्या भूमिकेकडे सा-यांचं लक्ष आहे. लोकसभेत महायुतीला पाठींबा देणारे राज ठाकरे जुलैमध्ये राज्यव्यापी दौरा करणार आहेत. स्वबळाच्या दृष्टीने मनसेच्या हालचाली असल्याची चर्चा आहे.
विधानसभेसाठी राज ठाकरे मैदानात, 20 जुलैपासून राज्याचा दौरा; मनसेची स्वबळाची तयारी?
Raj ThackeraySaam Tv

लोकसभेचा धुरळा शांत झाल्यावर आता विधानसभेसाठी सर्व पक्ष सज्ज झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेली मनसे विधानसभेसाठी मात्र ताकदीनीशी मैदानात उतरणार असल्याचं दिसतंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यासाठी जोरदार तयारी सुरू केलीय.

दर आठवड्याला पदाधाकिऱ्यांच्या बैठकांनंतर आता राज ठाकरे राज्यव्यापी दौरा करणार आहेत. 20 जुलैपासून राज ठाकरे विधानसभेचा आढावा घेण्यासाठी राज्यभर फिरणार आहेत. मनसे 225 विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक मनसे स्वबळावर लढवण्याची चर्चा सुरू झालीय.

विधानसभेसाठी राज ठाकरे मैदानात, 20 जुलैपासून राज्याचा दौरा; मनसेची स्वबळाची तयारी?
Maharashtra Rain: मान्सूननं संपूर्ण महाराष्ट्र व्यापला; कोकणाला पावसाचा ऑरेंज अलर्ट, पुढील 3 दिवस या जिल्ह्यांमध्येही कोसळणार पाऊस

जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रत्येक विधानसभेचा आढावा अहवाल द्या, असा आदेश राज ठाकरेंनी पदाधिऱ्यांना दिला आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. महायुतीसाठी कणकवली, पुणे, ठाणे, मुंबई इथं चार सभा घेतल्या होत्या. विशेष म्हणजे तिथले उमेदवार जिंकले होते. त्यामुळे मनसे विधानसभा निवडणुकाही महायुतीसोबत लढणार अशी शक्यता आहे. त्यामुळेच मनसेनं प्रभाव असलेल्या 20 जागांचा प्रस्ताव महायुतीकडे दिल्याची चर्चा आहे.

यामध्ये वरळी, माहीम, शिवडी, मागाठाणे, दिंडोशी, जोगेश्वरी, वर्सोवा, घाटकोपर पश्चिम, चेंबूर, ठाणे, भिवंडी ग्रामीण, कल्याण ग्रामीण, नाशिक पूर्व, यवतमाळमधील वणी, पंढरपूर, संभाजीनगर मध्य आणि पुण्यातील काही जागांचा समावेश आहे.

विधानसभेसाठी राज ठाकरे मैदानात, 20 जुलैपासून राज्याचा दौरा; मनसेची स्वबळाची तयारी?
Kangana Ranaut Video: कंगना रणौतची महाराष्ट्र सदनाकडे अजब मागणी, मुख्यमंत्री शिंदेंशी काय आहे कनेक्शन?

गेल्या काही निवडणुकांमध्ये मनसेला यश मिळालं नाही. राजकीय ताकद कमी असलेली मनसे स्वबळाची भाषा करत असली तरी विजयाच्या स्टेशनपर्यंत इंजिन धावणार का? हा खरा प्रश्न आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com