Amol Kolhe Saam tv
मुंबई/पुणे

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Amol Kolhe on Election Commission : निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेवरून अमोल कोल्हे यांनी भाजपवर टीका केली. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

Akshay Badve

पुणे : राहुल गांधींच्या आरोपानंतर घेतलेल्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेवरून खासदार अमोल कोल्हे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. 'निवडणूक आयोगावर आरोप केला जातो. तेव्हा उत्तर द्यायला भाजपचे नेते समोर येतात, हा गंमतीचा विषय आहे. त्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. निवडणूक आयोगाला जे प्रश्न केले, त्याचे उत्तर निवडणूक आयोगानेच द्यायला हवं, असं म्हणत खासदार अमोल कोल्हे यांनी भाजपवर तोफ डागली.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्या मतचोरीच्या आरोपानंतर निवडणूक आयोगाने उत्तर दिलं. याच कथित मतचोरीवरून महाराष्ट्राचं राजकारणही ढवळून निघालं आहे. राहुल गांधींच्या आरोपावरून शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी भाजपवर निशाणा साधला.

अमोल कोल्हे म्हणाले, 'एखाद्याने प्रश्न उपस्थित केला, तर त्याला आधी प्रश्नाचे उत्तर दिलं पाहिजे की शपथपत्र मागितलं पाहिजे हे निवडणूक आयोगानं सांगावं. लोकशाही आणि संविधानाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा प्रश्न आहे. राहुल गांधी यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत, ते संपूर्ण देशाच्या मनात आहेत. देशवासीयांच्या मनातल्या प्रश्नाला उत्तर देणे निवडणूक आयोगाच कर्तव्य होतं'.

खासदार कोल्हे पुढे म्हणाले, 'SIR विषयी आम्ही जाब विचारत आहोत. संसद अनेकदा बंद पडली आहे, पण यावर सरकार उत्तर देत नाही. राहुल गांधींनी या अनेक मतदारांना घरी बोलून भेट घेतली. त्यामुळे निवडणूक आयोगावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. बिहारमध्ये एकूण 65 लाख लोकांना मतदानापासून वगळण्यात आलं आहे. महाराष्ट्रात देखील हेच झालं. राज्यात शेवटच्या एक तासात 76 लाख लोकांनी मतदान केलं हे वाढलेलं मतदान कुठून आलं. मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहे'.

'विरोधी पक्षाने केलेलं दिल्लीतलं आंदोलन कौतुक करण्यासारखं होतं. या आंदोलनात स्वतः पवार साहेब आणि खर्गे साहेब रस्त्यावर उतरले होते. हे दर्शवतं की, जेव्हा गोष्टी संविधानावर येतात. लोकशाहीवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो, तेव्हा आम्ही सगळे कंबर कसून समोर येतात, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: शिवसेना कुणाची, शिंदे की ठाकरेंची? निकाल लागणार की पुन्हा तारीख पे तारीख? उद्या निकाल लागणार

प्रबोधनकार ठाकरेंचा विचार की हिंदू धर्माचा अपप्रचार; पुस्तकावरुन वादाची ठिणगी

Gautami Patil: गौतमी पाटीलच्या विरोधात पुण्यातील तरुण रस्त्यावर; नेमकं प्रकरण काय?

Rakesh Kishore News : परमात्म्याने सांगितलं तेच केलं...; सरन्यायाधीशांवरील हल्ल्यानंतर वकील राकेश किशोर काय म्हणाला?

Navi Mumbai Airport: कसं असेल नवी मुंबई विमानतळ? विमानतळावर 5G कनेक्टिव्हिटी आणि 'डिजी यात्रा' सुविधा

SCROLL FOR NEXT