मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाने कंबर कसरली आहे. शरद पवार गटाने राज्यात ८० हून अधिक जागांवर उमेदवार दिले आहेत. राज्यातील काही विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटापुढे अजित पवार गटाचंच आव्हान असणार आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर बारामतीतील अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार यांच्या लढाईकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. यासहित शरद पवार गटाला राज्यात बंडखोरांचही आव्हान असणार आहे.
शरद पवार गटाने काही पदाधिकाऱ्यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर नाराजांची संख्येतही भर पडली आहे. इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडाचा झेंडा फडकावला आहे. त्यामुळे या बंडखोरांना शमवण्याचं आव्हान असणार आहे. राज्यातील सात विधानसभा मतदारसंघात शरद पवारांना बंड थंड करण्याचं आव्हान असणार आहे. त्यामुळे ४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. त्यामुळे शरद पवार गटाला ४ तारखेपर्यंत मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे.
मोहोळ: बंडखोर उमेदवार संजय अण्णा क्षीरसागर,
अधिकृत उमेदवार: राजू खरे
बेलापूर:
बंडखोर उमेदवार: मंगेश आमले
अधिकृत उमेदवार: संदीप नाईक
मुरबाड: बंडखोर उमेदवार शैलेश वडनेरे (बदलापूर शहराध्यक्ष)
अधिकृत उमेदवार: सुभाष पवार
माजलगाव, बीड: बंडखोर उमेदवार: रमेश आडसकर,
अधिकृत उमेदवार: मोहन जगताप
इंदापूर: बंडखोर उमेदवार: प्रवीण माने,
अधिकृत उमेदवार : हर्षवर्धन पाटील
बीड: बंडखोर उमेदवार : ज्योती मेटे,
अधिकृत उमेदवार संदीप क्षीरसागर (विद्यमान आमदार)
आष्टी: बंडखोर उमेदवार: साहेबराव दरेकर (माजी आमदार) आणि राम खाडे,
अधिकृत उमेदवार: मेहबूब शेख
दरम्यान, शरद पवार गटाकडून आतार्यंत ८८ उमेदवारांची घोषणा झाली. शरद पवार गटाने पहिल्या यादीत ४५ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर दुसऱ्या यादीत २२ जणांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर तिसऱ्या यादीत ९ तर चौथ्या यादीत ७ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. तसेच पाचव्या यादीत शरद पवार गटाने ५ जणांच्या नावांची घोषणा करण्यात आली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.