सुनील काळे, साम टीव्ही
मुंबई : महाविकास आघाडीच्या मुंबईतील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार घणाघात केला. सिंधुदुर्गातील मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळण्यावरून शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली.
विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने सभांचा धडाका लावला आहे. महाविकास आघाडीने मुंबईत राहुल गांधी यांच्या उपस्थितीत जंगी सभेचं आयोजन केलं. महाविकास आघाडीची जाहीर सभा मुंबईतील बीकेसी मैदानात सुरु आहे. या सभेत शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. शरद पवार म्हणाले,महाराष्ट्र राज्य कसं चाललं पाहिजे, त्याचा निकाल घ्यायची वेळ आली आहे. प्रत्येक बाबतीत महाराष्ट्र घसरला आहे. शिवाजी महाराज देशाचं प्रतीक आहे. भ्रष्टाचार कसा सुरु आहे, त्याचं उदाहरण म्हणजे सिंधुदुर्गातील पुतळा पडणे'.
'गेट वे ऑफ इंडियाचा पुतळा किती काळापासून उभा आहे. त्याला काही झालं नाही. पण नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होतं आणि तो पुतळा पडतो. त्यामुळं शिवछत्रपतींचा अपमान झाला, असं म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवर टोकाची टीका केली.
'मनमोहन सिंग यांच्या काळातील शेतकऱ्यांसाठी ३ टक्के व्याजदार आणला आहे. महाविकास आघाडी सरकार आलं तर पंचसूत्रीमध्ये ३ लाख पर्यंतंच कर्ज माफ केलं जाईल. वेळेवर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन दिलं जाईल, असेही शरद पवारांनी सांगितले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.