Sharad Pawar Action Plan Ready Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: शरद पवार यांचा अॅक्शन प्लान रेडी; अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांशी साधला संपर्क; २०१९ ची पुनरावृत्ती?

शरद पवार यांचा अॅक्शन प्लान रेडी; अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांशी साधला संपर्क; २०१९ ची पुनरावृत्ती?

साम टिव्ही ब्युरो

>> ज्ञानेश्वर चौतमल

Sharad Pawar Action Plan Ready: राज्याच्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवार यांनी बंड केल्यानंतर स्वतः आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे अॅक्शन मोडवर आले आहेत. शरद पवार यांनी स्वतः अजित पवारांसोबत गेलेल्या सर्व आमदारांसोबत फोनवर संवाद साधला असल्याची माहिती मिळत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच आमदार परत येतील असा शरद पवार यांना विश्वास आहे. तर पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर काही आमदारांनी स्वता पवारांना फोन करत संपर्क साधला आहे. यामुळे पुन्हा एकदा २०१९ ची पुनरावृत्ती होणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

राज्यातील चित्र दोन-तीन दिवसांत लोकांसमोर येईल : शरद पवार

शरद पवार यांनी अजित पवार यांच्या बंडानंतर पत्रकार परिषद घेत म्हटलं होतं की,''अजित पवार यांच्यासोबत असलेल्यांनी माझ्याशी संपर्क साधला. विधीमंडळातील सदस्यांनी कितपत वेगळी भूमिका घेतली, याबद्दल चित्र आणखी दोन-तीन दिवसांत लोकांसमोर येईल.''

शरद पवारांनी १९८० सालाची ती घटना सांगितली...

पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले होते की, ''आजचा हा प्रकार माझ्यासाठी नवा नाही, १९८० साली मला अनेक जण सोडून गेले होते. त्यावेळी ज्यांनी पक्षाला सोडलं त्यापैकी काही जण सोडले तर सर्वजण पराभूत झाले.'' (Latest Marathi News)

पवार म्हणाले होते की, ''माझा राज्यातील जनतेवर पूर्ण विश्वास आहे. जे घडलं त्याची मला चिंता नाही. पक्षावर दावा केला तर मी लोकांमध्ये जाणार. उद्या सकाळी मी बाहेर पडणार आहे. यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचे दर्शन घेईल. राज्यात आणि देशात जेवढं पोहोचता येईल, लोकांशी संपर्क वाढवता येईल ते करेल.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahrukh Khan Real Name: किंग खानचे खरं नाव शाहरुख नाही तर 'हे' आहे; तुम्हाला माहितीये का?

Government Scheme: विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज; पीएम विद्यालक्ष्मी योजना नक्की आहे तरी काय?

Modi-Jinping: भारत-चीनमध्ये होणार नवी सुरुवात? रशियानंतर आता ब्राझीलमध्ये होऊ शकते मोदी-जिनपिंग भेट

Viral Video: चाळीतील महिलांची सर्वत्र चर्चा! दिलात झापुक झूपूक गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO एकदा पाहाच

Apaar ID: प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार अपार कार्ड, १२ अंकी युनिक नंबर, उपयोग काय?

SCROLL FOR NEXT