Sharad Mohol CCTV Saam TV
मुंबई/पुणे

CCTV Footage : कुख्यात गुंड शरद मोहोळच्या हत्येची घटना सीसीटीव्हीत कैद, VIDEO आला समोर

Sharad Mohol News : आर्थिक आणि जमिनीच्या वादातून हत्या शरद मोहाळची हत्या करण्यात आली होती. त्याच्या साथीदारांनीच त्याच्यावह हा केल्याचं पोलीस तपासात उघड झालं होतं.

प्रविण वाकचौरे

Sharad Mohol killed CCTV Footage :

पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची शुक्रवारी भररस्त्यातच झालेल्या हत्येने खळबळ उडाली होती. शरद मोहोळच्या हत्येने अख्खं पुणं हादरलं होतं. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आला आहे. हल्लेखोरांनी शरद मोहोळवर कसा हल्ला केला हे या व्हिडीओतून दिसत आहे.

आर्थिक आणि जमिनीच्या वादातून शरद मोहाळची हत्या करण्यात आली होती. त्याच्या साथीदारांनीच त्याच्यावर हल्ला केल्याचं पोलीस तपासात उघड झालं होतं. पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकरसह ८ जणांना अटक केली आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हिडीयोतील दृष्यांनुसार, शरद मोहोळ कोथरुडमधील सुतारदरा परिसरातील आपल्या घरातून बाहेर निघाला होता. त्याच्या साथीदारांसोबत तो रस्त्यावरुन चालताना दिसत आहे. मात्र अचानक रस्त्यातच त्याच्यावर त्याच्यासोबत चालणाऱ्या साथीदारांनी हल्ला चढवला. (Crime News)

तीन जणांना आपल्याजवळील पिस्तुलातून शरद मोहोळवर गोळ्या झाडल्या. काही क्षणात शरद मोहोळ जमिनीवर कोसळला. त्यानंतर हल्लोखोरांनी घटनास्थळावरुन पळ काढला.

कोण होता शरद मोहोळ?

शरद मोहोळ हा मुळशी तालुक्यातील रहिवासी होता. त्याचे आई वडील शेतकरी असून बेताच्या परिस्थितीत मोठा होऊनही तो गुन्हेगारीकडे वळला होता. गुन्हेगारी क्षेत्रात सुरुवातीला शरदने कुख्यात गुंड संदीप मोहोळ याचा ड्रायव्हर म्हणून काम केले. मात्र, याच संदीप मोहोळची हत्या झाल्यानंतर तो गुन्हेगार म्हणून नावारुपास आला होता. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO UAN Merge: तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पीएफ अकाउंटचे यूएएन आहेत? मग मर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घ्या

Kidney damage: डोळ्यांमध्ये दिसणारे हे ५ बदल वेळीच ओळखा; किडनी खराब होण्याची असतात लक्षणं

Black Raisins: लोखंडाप्रमाणे मजबूत हाडं हवीत? मग 'या' पदार्थाचं करा सेवन

Maharashtra Live News Update: मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून बीड शहरात नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने बैठका सुरू

Delhi Blast: स्फोट घडवण्यासाठी दोन कारचा वापर? i20 नंतर EcoSport कारचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT