Who is Sharad Mohol: Saamtv
मुंबई/पुणे

Sharad Mohol: लग्नाच्या वाढदिवशीच शरद मोहोळची हत्या, मंदिरात जाण्याच्या तयारीत असतानाच...

Sharad Mohol Latest News: पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची शुक्रवारी दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. काही हल्लेखोरांनी पिस्तुलातून तीन गोळ्या झाडून मोहोळची हत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.

साम टिव्ही ब्युरो

Sharad Mohol News :

पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची शुक्रवारी दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. काही हल्लेखोरांनी पिस्तुलातून तीन गोळ्या झाडून मोहोळची हत्या केली. गोळ्या झाडल्यानंतर जखमी झालेल्या मोहोळचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आर्थिक आणि जमिनीच्या वादातून हत्या झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेने पुण्यात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

शरद हिरामण मोहोळ (४०) आणि त्याचे कुटुंबीय कोथरुडमधील सुतारदरा परिसरात राहतात. शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शरद मोहोळ कार्यालयातून घरी जात होता. त्यावेळी शरद मोहोळचा साथीदार साहिल उर्फ मुन्ना संतोश पोळेकर हा त्याच्यासमवेत पाठीमागून येत होता.

संतोष पोळेकर याने पाठीमागून आणि इतर दोन हल्लेखोरोंनी मोहोळवर समोरून गोळ्या झाडल्या. शरद मोहोळच्या गळ्याजवळ छातीवर आणि उजव्या खांद्याजवळ गोळ्या लागल्या. तर एक गोळी आरपार गेली. गोळीबारानंतर मोहोळला रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारादरम्यान मोहोळचा मृत्यू झाला. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मोहोळच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनानंतर ससून रुग्णालयात आणला. शरद मोहोळच्या साथीदारांनी ससून परिसरात गर्दी केली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. शरद मोहोळ याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

लग्नाच्या वाढदिवशीच हत्या

मोहोळच्या लग्नाचा शुक्रवारी वाढदिवस होता. मोहोळ श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी जाण्याच्या तयारीत होता. मोहोळवर हल्लेखोरांनी दहा ते बारा दिवसांपासून पाळत ठेवली होती. मोहोळच्या लग्नाच्या वाढदिवशीच हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडून हत्या केली.

शरद मोहोळची पार्श्वभूमी

गुंड संदीप मोहोळची ऑक्टोबर २००६ मध्ये पौड फाटा चौकात प्रतिस्पर्धी टोळीने गोळी झाडून हत्या केली. त्यानंतर संदीप विश्वासू साथीदार शरद मोहोळ आणि साथीदारांनी नीलायम चित्रापटाजवळ हॉटेलमध्ये प्रतिस्पर्धी गणेश मारणे टोळीतील पिंटू मारणेची गोळ्या झाडून हत्या केली. मारणे हा नंटरग चित्रपट पाहण्यासाठी आला होता.

कातिल सिद्दीकीच्या खुनामुळे चर्चेत

पिंटू मारणे हत्या प्रकरणात मोहोळ आणि आलोक भालेरावची येरवडा कारागृहातील अंडा सेलमध्ये रवानगी करण्यात आली होती. याच अंडा सेलमध्ये बॉम्बस्फोटातील इंडियन मुजाहिदीनचा संशयित दहशतवादी कातिल सिद्दिकी देखील शिक्षा भोगत होता. त्या सेलमध्येच कातिलची पायजम्याच्या नाड्याने गळा आवळून हत्या झाली होती. त्यामुळे मोहोळ देशभर चर्चेत आला होता. मारणे हत्या प्रकरणात मोहोळ आणि आलोक भालेरावची पुराव्याअभावी निर्दोश सुटका झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stray Animal Attack : मुलासाठी आई बनली ढाल! मोकाट जनावराने मुलाला पायदळी तुडवलं, पण मातेनं वाचवले प्राण, घटना CCTVत कैद

Cancer Risk: कारण नसताना पाठ, छाती किंवा डोकं दुखतंय? असू शकतो कॅन्सरचा धोका, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Gold Rate Today: दसऱ्याच्या आदल्या दिवशी सोनं ₹१२०० रुपयांनी महागलं, वाचा २४ कॅरेट सोन्याचा आजचा दर

Kalyan : कल्याण डोंबिवलीत वाहतूक कोंडीचा विळखा; नो-एंट्री आदेशानंतरही रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

Maharashtra Live News Update: रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही

SCROLL FOR NEXT