8 वकिलांविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा, महिला वकिलानंच केली तक्रार (पहा व्हिडिओ) Saam Tv
मुंबई/पुणे

8 वकिलांविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा, महिला वकिलानंच केली तक्रार (पहा व्हिडिओ)

लैंगिक अत्याचार करून ५० लाख रुपयांची खंडणी देखाली मागितली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - आठ वकिलांविरुद्ध Layer अत्याचार, खंडणी, लैंगिक अत्याचार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मरीन ड्राईव्ह Marine Drive पोलीस ठाण्यात Police Station गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वकील महिलेने दिलेल्या तक्रारीवरून या आठ वकिलांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अशी माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ कोळेकर यांच्याकडून देण्यात आली आहे.

पीडित महिला ही व्यवसायाने वकील असून ती गेल्या काही महिन्यांपासून नरिमन पॉईंट येथील एका बड्या वकिलाच्या फर्ममध्ये काम करत होती. पीडित महिलेने काल मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात धाव घेऊन या ८ जणांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत तिने फर्मचे मुख्य वकील यांच्यासह इतर आठ जणांनी वेगवेगळ्या वेळी माझा लैंगिक अत्याचार विनयभंग केला तर माझ्यावर लैंगिक अत्याचार करून ५० लाख रुपयांची खंडणी देखाली मागितली, असा आरोप या महिला वकिलाने केला आहे.

या आठ वकिलांमध्ये सुभाष झा, घनश्याम उपाध्याय त्यांच्यासह २ महिला वकिलांचा समावेश आहे. या ८ वकिलांविरुद्ध लैगिंग अत्याचार, खंडणी, विनयभंग आणि जीवे मारण्याची धमकी देणे इत्यादी गंभीर स्वरूपाचे कलम लावण्यात आले आहे. या गुन्ह्यात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. सध्या पुढील तपास सुरू असल्याची माहिती मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ कोळेकर यांनी दिली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोळसेवाडी पोलीस ठाणे राडा प्रकरण; भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाडांना दिलासा, कोर्टाकडून निर्दोष मुक्तता

Rajabai Tower History : मुंबईचा बिग बेन! राजाबाई टॉवरच्या नावामागचा रंजक किस्सा जाणून घ्या

Maharashtra Live News Update: - एकवीस दिवसाच्या गणरायाच्या विसर्जनाने गणेशोत्सवाची सांगता..

Local Body Election: राज्यातील निवडणुका तीन टप्प्यात होणार? अशी असू शकते निवडणूक प्रक्रिया

Dhule News: धुळ्यात अपघाताचा थरार! दोन ट्रकची जोरदार धडक; एकाचा जागीच मृत्यू तर ७० बकऱ्या मृत्यूमुखी

SCROLL FOR NEXT