मुंबई पुन्हा हादरली; डिलिव्हरी बॉयचे 6 वर्षीय चिमुकलीसोबत विकृत कृत्य Saam Tv
मुंबई/पुणे

मुंबई पुन्हा हादरली; डिलिव्हरी बॉयचे 6 वर्षीय चिमुकलीसोबत विकृत कृत्य

चारकोप परिसरात एका 6 वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत डिलिव्हरी बॉयने अत्याचार केले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात महिलांसोबत होणारे अत्याचार वाढत चालले आहेत. महिलाविरोधी होणाऱ्या अत्याचारांत प्रचंड वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी साकीनाका परिसरात 30 वर्षीय महिलेवर अमानुष अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असताना बलात्काराच्या घटनेनं मुंबई पुन्हा हादरली आहे. चारकोप परिसरात एका 6 वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत डिलिव्हरी बॉयने अत्याचार केले आहेत. याप्रकरणी पीडितेच्या आई वडिलांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

हे देखील पहा-

वृत्तानुसार, आरोपी डिलिव्हरी बॉय हा चारकोप हद्दीतील एका इमारतमध्ये पार्सल देण्यासाठी आला होता. त्यावेळी याठिकाणी 6 वर्षीय पीडित मुलगी उभी होती. आरोपीनं तिला तिचा पत्ता विचारला. पत्ता सांगत ती त्याला विचारलेल्या पत्त्यावर घेऊन गेली. याठिकाणी कोण पाहत नसल्याची संधी साधत, आरोपीने पीडितेसोबत जबरदस्ती अत्याचार केला आहे.

यानंतर नराधम आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. या संतापजनक घटनेनंतर पीडित मुलगी वेदनेने रडत आपल्या आई वडिलांकडे गेली आणि तिने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार आपल्या आई वडिलांना सांगितला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीला न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smriti Mandhana: स्मृती मंधानाच्या बालमित्राची पलाश मुच्छलकडून फसवणूक; सांगली पोलिसांत तक्रार दाखल, प्रकरण काय?

Jalgaon Mayor : जळगाव महापालिकेच्या महापौरपदी महिलाराज, ४ महिलांचं नाव चर्चेत; वाचा संपूर्ण

काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या पुतण्याने बायकोला संपवलं, नंतर स्वत:वर झाडल्या गोळ्या

Maharashtra Live News Update : पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का

Silver Earrings Design: सिल्वर कानातल्यांचा भलताच ट्रेंड, हे आहेत 5 लेटेस्ट कानातले डिझाईन्स

SCROLL FOR NEXT