"देवमाणसाची" पुनरावृत्ती; ससूनमधील तोतया डॉक्टरकडून तरुणीवर बलात्कार Saam Tv
मुंबई/पुणे

"देवमाणसाची" पुनरावृत्ती; ससूनमधील तोतया डॉक्टरकडून तरुणीवर बलात्कार

पुण्यामधील ससून रुग्णालयात डॉक्टर असल्याची खोटी माहिती देऊन एका तरुणाने पिंपरीमधील तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे : पुण्यामधील ससून रुग्णालयात डॉक्टर असल्याची खोटी माहिती देऊन एका तरुणाने पिंपरीमधील तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फिर्यादी तरुणीच्या घरी सुरू असलेल्या कौटुंबिक वादाचा गैरफायदा घेऊन आरोपीने पीडितेवर खूपवेळा अत्याचार केला आहे. तसेच पीडितेचे अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल देखील करण्यात आले आहे. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित तरुणीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

हे देखील पहा-

पोलिसांनी तातडीने कारवाई करत तोतया डॉक्टरला बेड्या ठोकले आहेत. या घटनेचा पुढील तपास विमानतळ पोलीस करत आहेत. नायका रुद्रा रमेशराव ऊर्फ किशन रमेशराव जाधव असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या 33 वर्षीय तरुणाचे नाव आहे. तो विमाननगर परिसरामधील रहिवासी आहे. याप्रकरणी पिंपरी येथील रहिवासी असणाऱ्या 29 वर्षीय महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

नराधम आरोपी मागील ७ महिन्यांपासून पीडित तरुणीला ब्लॅकमेल करत तिचे लैंगिक शोषण करत होता. अखेर पीडितेने हिंमत दाखवून आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किशन याने आपण डॉक्टर असून ससून रुग्णालयात नोकरीस असल्याची खोटी माहिती दिली होती.

तसेच स्वत:चे नर्सिंग आणि फार्मसी कॉलेज असल्याच्या थापा देखील मारले होते. त्याकरिता आरोपीने खोटे आयकार्ड आणि वैद्यकीय पदवीची कागदपत्रे दाखवून पीडितेचा विश्वास संपादन केला होता. फिर्यादीच्या घरी सुरू असलेल्या कौटुंबिक वादाचा गैरफायदा घेत आरोपीने जवळीक साधून तिच्याशी जबरदस्तीने शरीरसंबंध प्रस्थापित करत अश्लील व्हिडीओ शूट करण्यात आले होते.

संबंधित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने पीडितेवर वारंवार बलात्कार केला होता. याशिवाय, आरोपीने फिर्यादी तरुणीच्या नातेवाईकांना नोकरी लावण्याच्या बहाण्याने तिच्याकडून तब्बल १६ लाख ६५ हजार रुपयांची रक्कम घेतली होती. पण नातेवाईकांना नोकरी न लावता त्यांची आर्थिक फसवणूक केली होती. बदनामीच्या भीतीने फिर्यादी तरुणी आरोपीचा सर्व छळ निमूटपणे सहन करत होती. अखेर तिने हिंमत एकवटून पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तोतया डॉक्टरला अटक केली असून पुढील तपास केला जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अजित पवारांच्या निवासस्थानी मोठा जल्लोष

Health tips: दालचिनीचे पाणी प्यायल्यास होतील 'हे' जबरदस्त फायदे

Eknath Shinde: महायुतीच्या विजयानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; शिंदेंनी मानले मतदारांचे आभार

Jasprit Bumrah: ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव? बुमराहवर फेकी बॉलिंगचे आरोप! सोशल मीडियावर पेटला वाद

Vidhan Sabha Election Result : खडसेंना धक्का; शिंदे शिवसेनेची जागा कायम

SCROLL FOR NEXT