मुंबईमध्ये Sex Tourism रॅकेटचा पर्दाफाश: क्राईम ब्रांचची कारवाई  Saam Tv
मुंबई/पुणे

मुंबईमध्ये Sex Tourism रॅकेटचा पर्दाफाश: क्राईम ब्रांचची कारवाई

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने Mumbai Crime Branch एक मोठी कारवाई करत सेक्स टुरिझमचा Sex Tourism चा पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणी मुंबई क्राईम ब्राँचने २ महिला दलालांना अटक करण्यात आली आहे. तर २ तरुणींची सुटका करण्यात आली आहे. आरोपी महिला ही २ तरुणींना घेऊन मुंबई विमानतळावर Mumbai Airport येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

हे देखील पहा-

यानंतर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे. ही टोळी सर्वप्रथम ग्राहक शोधत होती. जर ग्राहक मिळाला तर त्यानंतर बोलणी अगोदरच डील फायनल केले जात असत. यानंतर ही टोळी तरुणींना ग्राहकाबरोबर संपूर्ण भारतभर फिरण्याकरिता पाठवत असत. भारतात विविध पर्यटनस्थळांवर फिरण्याकरिता त्यांना पाठवण्यात येत होते. गोवा हे त्यांचे आवडते ठिकाण होते.

यावेळी ग्राहकांसोबत देह व्यापार केला जात असत. प्रथम काही मुलींचे फोटो ग्राहकांना पाठवण्यात येत होते. ग्राहकांना मुलींचा फोटो आवडल्यावर गोवा किंवा इतर ठिकाणावर जाण्यासाठी फ्लाईट तिकिट स्वत: बुक करावी लागत असत. ग्राहकांकडून ही टोळी २ दिवसांकरिता ५० हजार रुपये घेत असत. अटक करण्यात आलेल्या आरोपी त्या मुलींकडून २० टक्के कमिशन घेत असत. यानंतर आपल्या आवडत्या मुलीबरोबर ग्राहकाला २ दिवस फिरण्याकरिता गोवा किंवा अन्य ठिकाणी पाठवले जात असत.

यानंतर २ दिवसांनी परत हे मुंबईला येत असतं. मुंबई क्राईम ब्राँचच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाली होती की, २०२० मध्ये देह व्यापार करणाऱ्या ज्या महिलेला अटक करण्यात आली होती. त्याच महिला आता आपल्या जोडीदाराबरोबरच अन्य मार्गाने देह व्यापार करत आहेत. त्यानंतर पोलिसांनी मुंबई विमानतळावरती सापळा रचून कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्या महिलेच्या विरोधात ३७० (२) (३) आणि पिटा PITA कलम ४,५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By- Digambar jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT