Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Mahayuti Rally In Kolhapur: कोल्हापुरात महायुतीने प्रचार सभा घेतली. यावेळी तिन्ही पक्षाचे नेते उपस्थित होते. महायुतीने लाडकी बहीण योजना, शेतकरी कर्जमाफी संदर्भात मोठ्या घोषणा केल्या आहेत.
Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं
Mahayuti Rally In Kolhapur
Published On

सरकार आलं तर लाडक्या बहिणींना १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये दिले जातील.तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि वर्षाकाठी १५००० हजार रुपये दिले जाणार, असल्याची अशी घोषणा महायुतीकडून करण्यात आलीय. विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा धुराळा उडालाय. राजकीय पक्षाचे उमेदवारांनी प्रचारासाठी कंबर कसलीय.

राज्यात मविआ आणि महायुतीत सरळ लढत आहे. मविआनंतर महायुतीने कोल्हापूरमध्ये प्रचाराचा नारळ फोडला. या सभेत महायुतीने राज्यातील जनतेला १० वचनं दिली आहेत. या वचना त्यांनी महिलांना दिला जाणारी आर्थिक मदतीत वाढ करण्यात येणार असल्याची घोषणा केलीय.

याचबरोबर महायुतीच्या नेत्यांकडून इतर वचनंही देण्यात आली आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला रु.१५००० दिले जातील. तसेच अंगणवाडी आणि आशा सेविकांना रु.१५००० आणि सुरक्षा कवच देण्यात येणार आहे. याबाबत बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले, माझ्या लाडक्या बहिणी आहेत. लाडक्या बहिणीच्या बाबतीमध्ये मी बोलतो ते काय विरोधक करतायेत. कशी त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे कशी धडकी भरली आहे. त्यांच्यावर मी बोलतो पण आता जे आम्ही बोलतो ते करून दाखवतो. म्हणून लाडक्या बहिणी बहिणींना १५०० वरून २१०० रुपये देणार असल्याचं जाहीर करत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं
Subhadra Yojana: या राज्याचे सरकार महिलांना देतंय १०,००० रुपये; सुभद्रा योजना नेमकी आहे तरी काय?

त्याचबरोबर महिला सुरक्षेला आम्ही प्राधान्य दिलंय. महिला सुरक्षेसाठी २५००० महिलांना पोलीस दलामध्ये भरती करण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत. शेतकरी आपला अन्नदाता आहे मायबाप आहे. यात महाराष्ट्राच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा आहे. म्हणून आम्ही दुसरी योजना ही शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजना आहे.

पंतप्रधान सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना ६००० , १२००० जी आहे. त्यात वाढ करण्यात येणार आहे. सन्मान योजना वर्षाला पंधरा हजार रुपये करण्याचा निर्णय घेतलाय. त्याचबरोबर एमएसपीवर २० टक्के अनुदान देण्याचा देखील निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलीय.

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं
PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेसंदर्भात मोठी अपडेट, पुढच्या हप्त्याची तारीख आली समोर

पुढची तयारी

कोल्हापूरच्या प्रचार सभेत महायुतीकडून १० वचने जाहीर

१) लाडक्या बहिणींना रु.२१००

प्रत्येक महिन्याला रु.१५०० वरुन रु.२१०० देण्याचे तसेच महिला सुरक्षेसाठी २५,००० महिलांना पोलीस दलात समावेश करण्याचे वचन!

२) शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला रु.१५०००

प्रत्येक वर्षाला रु.१२,००० वरुन रु.१५,००० देण्याचे तसेच MSP वर २०% अनुदान देण्याचे वचन!

३) प्रत्येकास अन्न आणि निवारा

प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देण्याचे वचन!

४) वृद्ध पेन्शन धारकांना रु.२१००

महिन्याला रु.१५०० वरुन रु.२१०० देण्याचे वचन!

५) जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर

राज्यातील जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवण्याचे वचन!

६) २५ लाख रोजगार निमिर्ती तसेच १० लाख विद्यार्थ्यांना रु.१०,०००

प्रशिक्षणातून महिन्याला १० लाख विद्यार्थ्यांना रु.१०,००० विद्यावेतन देण्याचे वचन!

७) ४५,००० गावांत पांदण रस्ते बांधणार

राज्यातील ग्रामीण भागात पांदण रस्ते बांधण्याचे वचन!

८) अंगणवाडी आणि आशा सेविकांना रु.१५००० आणि सुरक्षा कवच

महिन्याला रु.१५,००० वेतन आणि संरक्षण देण्याचे वचन!

९) वीज बिलात ३०% कपात करुन सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्याचे वचन!

१०) सरकार स्थापनेनंतर ‘व्हिजन महाराष्ट्र@२०२९ ‘

१०० दिवसांच्या आत सादर करण्याचे वचन!

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com