Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Maharashtra Marathi News Live Updates : आज मंगळवार दिनांक ०५ नोव्हेंबर २०२४. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, विधानसभा निवडणुका, कोल्हापूर सभा, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Updates:
Maharashtra Live News UpdatesSaam tv
Published On

भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

शिवडीत भाजपचा मनसेला पाठिंबा. भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा. पक्ष म्हणून नाही उमेद्वार म्हणून पाठिंबा देण्यात आल्याचं भाजपकडून सांगण्यात येत आहे. उमेदवार हा हिंदूच्या बाजूने उभा राहील, असेही सांगण्यात येत आहे.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण; प्रज्ञासिंह ठाकूर विरोधात एनआयए कोर्टाने बजावला जामीनपात्र वॉरंट

मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी विशेष एनआयए कोर्टाने भाजप नेत्या प्रज्ञासिंह ठाकूर विरोधात जामीनपात्र वॉरंट बजावला आहे. सुनावणी दरम्यान गैरहजर राहिल्याने प्रज्ञासिंह ठाकूर विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केलाय. खटल्याचा अंतिम युक्तिवाद सुरू असून आरोपीने सुनावणीला हजर राहणे गरजेचे असल्याचं न्यायालयाने म्हटलंय.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेत मोठी फूट, प्रदेशाध्यक्षांचा शिवसेनेत प्रवेश

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक जालंदर पाटील आणि जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील शिवसेनेत दाखल झालेत.

मुक्ताईनगरातील उमेदवारांना 'झेड प्लस' सुरक्षा द्या: एकनाथ खडसे

मुक्ताईनगरातील अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्यावर झालेला गोळीबार ही गंभीर बाब असून येथील सर्व उमेदवारांना 'झेड प्लस' सुरक्षा द्यावी !'' अशी मागणी आमदार एकनाथ खडसे यांनी केली. ते आज पत्रकारांशी बोलत होते. गेल्या दहा पाच वर्षांमध्ये मुक्ताईनगर तालुक्यामध्ये गुंडगिरी वाढलेली आहे, प्रत्येक गावामध्ये दहा पाच गुण निर्माण झाले आहेत तेही पोलिसांच्या संरक्षणामुळे, त्याचा परिणामच आज या उमेदवारावरती गोळीबार झाला यामुळे मुक्ताईनगर तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था किती बिघडली आहे हे दिसून येत आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

Pune Accident:  नवले ब्रिजवर दोन चारचाकी वाहनांचा अपघात; ३ जण गंभीर जखमी

पुण्यातल्या नवले ब्रिजवर दोन चारचाकी वाहनांचा अपघात झाला असून यात ३ जण गंभीर जखमी झालेत. सायंकाळीं ७ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडलाय. पुण्याच्या दिशेने येणारे २ चारचाकी वाहने एकमेकांना धडकली होती. घटनास्थळी पोलीस दखल झालेत. जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे .

रत्नागिरीत उद्धव ठाकरेंची प्रचार सभा सुरू

रत्नागिरीत उद्धव ठाकरे आपल्या उमेदवारासाठी प्रचार सभा घेत आहेत. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी राणे पिता-पुत्रावर टीका केलीय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री अंबाबाईच्या दर्शनाला

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी अंबाबाईचं दर्शन घेतलंमुख्यमंत्र्यांसोबत कोल्हापूर जिल्ह्यातले महायुतीचे सर्व उमेदवार उपस्थित आहेत. अंबाबाईचे दर्शन घेऊन मुख्यमंत्री महायुतीच्या सभेला जाणार आहेत.

राजेश लाटकर काँग्रेसचे पुरस्कृत उमेदवार; शाहू महाराजांची घोषणा

राजेश लाटकर काँग्रेसचे पुरस्कृत उमेदवार आहेत, अशी घोषणा शाहू महाराज यांनी केली.इंडिया आघाडीच्या एकत्रित बैठकीत हा निर्णय झाल्याचं ते म्हणाले. लाटकर यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे. तिकीट कापलेल्या उमेदवारालाच पुरस्कृत उमेदवार केले आहे. मधुरीमाराजे यांनी काँग्रेसच्या उमेदवारी मधून माघार घेतल्याने त्या जागी अपक्ष असलेल्या राजेश लाटकर यांना काँग्रेसने पुरस्कृत उमेदवार केले आहे.

Assembly Election: महायुतीची कोल्हापूरमध्ये मोठी प्रचार सभा, लाडक्या बहिणींसाठी काही घोषणा होण्याची शक्यता

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंत्री अजित दादा पवार उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठ्या घोषणा करतील अशी शक्यता आहे. महयुतीचा दहा सूत्री कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. लाडक्या बहिणींना खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. महिला, शेतकरी, युवकांबाबत महायुतीचा मोठा प्लॅन आहे.

यवतमाळमध्ये राज ठाकरेंच्या सभेला सुरुवात

राज ठाकरेंच्या सभेला सुरुवात झालीय. यवतमाळमधील उमेदवारासाठी राज ठाकरे प्रचार सभा घेत आहेत.

भाजपचे नाराज उमेदवार मोहन सूर्यवंशी यांनी फोडला प्रचाराचा नारळ

साक्री मतदारसंघामध्ये महायुतीतील भाजपचे नाराज उमेदवार मोहन सूर्यवंशी यांनी बंडखोरी केल्यामुळे महायुतीच्या शिंदे गट शिवसेनेच्या उमेदवार मंजुळा गावित यांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे, भाजपचे नाराज उमेदवार मोहन सूर्यवंशी यांनी आपला दाखल केलेला अपक्ष उमेदवारी अर्ज माघारी न घेता आज त्यांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. मोहन सूर्यवंशी यांनी आज आपल्या प्रचाराचा नारळ फोडत साक्री शहरातून जोरदार प्रचाराला सुरुवात केली असून, महायुतीच्या शिंदे गट शिवसेनेच्या उमेदवार मंजुळा गावित यांना हे आवाहन मानले जात आहे.

शिवसेना शिंदे गटाचे नेते आमदार राजू पारवे यांचा भाजपमध्ये प्रवेश

शिवसेना शिंदे गटाचे नेते व माजी आमदार राजू पारवे यांनी आज शिवसेना ( शिंदे गट) सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

थोड्या वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या घरी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे.

उमरेड मतदारसंघ भाजपला सुटल्यानंतर राजू पारवे यांनी सुरुवातीला बंडखोरीचा पवित्रा घेतला होता.

मात्र देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टाई केल्यानंतर त्यांच्या शब्दावर कालच राजू पारवे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेत भाजपला उमरेड मतदार संघात दिलासा दिला होता.

बेलापूर मधून संदीप नाईक यांनी फोडला प्रचाराचा नारळ

बेलापूर मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप नाईक यांनी आज प्रचाराचा नारळ फोडत प्रचाराला सुरुवात केलेय. विद्यमान आमदारांची मतदार संघातील अनुपस्थिती आणि नागरिकांना मिळणारी अपमानास्पद वागणूक या विरोधात जनतेने ही निवडणूक हातात घेतली असून बेलापूर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी बेलापूर मतदारसंघातील जनता महाविकास आघाडीला मतदान करतील असा विश्वास यावेळी संदीप नाईक यांनी व्यक्त केलाय.

बारामतीत भाजपला मोठा धक्का; बड्या नेत्याचा शरद पवार गटात प्रवेश

शरद पवारांच्या उपस्थितीत बारामतीतील भाजपचे नेते हनुमंत कोकरे यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होतोय.

वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा जाहीर

कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक ; उद्धव ठाकरेंनी दिला कानमंत्र

उद्धव ठाकरे हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी ठाकरे यांनी कोल्हापुरातल्या उजळाईवाडी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार आणि प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी कोल्हापुरातील महाविकास आघाडीचे दहाही उमेदवार उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र देत काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांचं कौतुक करत महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर दिलीय. तसेच मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांनी एक दिलाने कामाला लागावं असं उद्धव ठाकरेंनी म्हटले.

शेअर बाजारात पुन्हा बहार, सेन्सेक्स ६९४ अंकांनी वधारला

मिलिंद देवरा यांच्याविरोधात  निवडणूक आयोगाकडे तक्रार

ठाकरे गटाचे नेते आणि खासदार अनिल देसाई यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

वरळीतील शिंदे गटाचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्या विरोधात अनिल देसाई यांच्याकडून तक्रार करण्यात आलीय. वरळी येथील शोभायात्रेत पाचशे रुपये देऊन आम्ही या यात्रेत सहभागी झाला असल्याचं लोकांनी कबूल केला आहे. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने कारवाई करावी, अशी तक्रार अनिल देसाई यांनी दिली आहे. आचारसंहितेचा भंग मिलिंद देवरा यांनी केला असून यांच्यावरती कडक कारवाई करावी अनिल देसाई यांची मागणी

संसदेचे हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबरपासून

२५ नोव्हेंबर ते २० डिसेंबरपर्यंत हिवाळी अधिवेशन चालणार आहे. केंद्रीय सांसदीय कार्यमंत्री किरेन रिजीजू यांनी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिलीय.

पोर्श कार अपघात प्रकरण; अरुण कुमार सिंग यांचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला

रक्त नमुने फेरफार प्रकरणात आरोपी अरुण कुमार सिंग यांच्या मुलाचेही रक्त नमुने बदलले होते. आरोपी अरुण कुमार सिंग यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. त्याला पुणे शहर पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

काँग्रेस मधून बंड केलेल्या अपक्ष उमेदवार आबा बागुल यांना मिळालं चिन्ह

काँग्रेस मधून बंड केलेल्या अपक्ष उमेदवार आबा बागुल यांना मिळालं चिन्ह

आबा बागुल यांना "हिरा" हे चिन्ह देण्यात आलं आहे आहे

बागुल हे पर्वती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार

काँग्रेस मधून उमेदवारी न मिळाल्यामुळे आबा बागुल अपक्ष निवडणूक लढवणार

पुण्यातील पर्वती मध्ये तिरंगी लढत होणार

विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादी च्या अश्विनी कदम तर अपक्ष आबा बागुल रिंगणात

सांगोल्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा दीपक साळुंखे यांना पाठिंबा

सांगोल्यात मोठी राजकीय घडामोडी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ठाकरे गटाचे उमेदवार दीपक साळुंखे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाच्या अडचणी वाढल्या आहेत.

आज दिपक साळुंखे यांचा प्रचाराचा शुभारंभ झाला.‌यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष जयमाला गायकवाड यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.

Satara News : साताऱ्यातील शेंद्रे येथे 1 कोटी रुपयांची रोकड जप्त

पुणे बंगलोर महामार्गावर सातारा तालुका पोलिसांची मोठी कारवाई...

पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी केली कारवाई ...

क्रेटा गाडीत सापडली रोकड...

पोलिसांना मिळालेल्या माहिती नंतर गाडीचा तपासणीत सापडली मोठी रक्कम...

रोकड नेमकी कोणाची याचा तपास सुरू...

उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल

उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलं उद्धव ठाकरे यांचे स्वागत

सतेज पाटील, सत्यजित सरूडकर, राहुल पाटील, संजय पवार यांच्यासह अन्य नेत्यांनी केलं उद्धव ठाकरे यांचे स्वागत

Maharashtra Marathi News Live Updates : भाजपचे बंडखोर उमेदवार विशाल परब यांची हकालपट्टी

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून विशाल परब यांनी केलीय बंडखोरी. वरिष्ठांनी समज देऊन देखील विशाल परब यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केली हकालपट्टी निवडणूक काळात विशाल परब यांना मदत करणाऱ्या भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर देखील दिले कारवाईचे संकेत.

Maharashtra Marathi News Live Updates :  कालच्या विषयावर पडदा टाकत आहे. पुढील दिशा संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल - सतेज पाटील

Maharashtra Marathi News :  अब्दुल सत्तार यांच्या प्रचाराला भाजपचा नकार

सिल्लोड विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार अब्दुल सत्तार यांच्या प्रचारावर स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचे शहराध्यक्ष कमलेश कटारिया यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आम्ही बहिष्कार टाकणार टाकला आहे असे सांगितले आहे.

Pune Crime : विमानामध्ये बॉम्ब असल्याच्या अफवा पसरवल्याच्या घटनांमध्ये वाढ

इंडिगो एअरलाइन्स कंपनीच्या विमानात बॉम्ब ठेवल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल

अफवा पसरविल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांकडून सोशल मीडियातील खातेधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अॅडमलान्झा ९७५१४ या नावाने सोशल मीडियावर खाते वापरणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुरबाडमध्ये तिघांची माघार, तर ९ उमेदवार रिंगणात

मुरबाड मतदारसंघात अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ३ उमेदवारांनी माघार घेतली असून आता ९ उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी भाजपाचे किसन कथोरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुभाष पवार यांच्यात प्रमुख लढत होणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ६ दिवसांत २१ सभांचा धडाका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चार सभा महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी घेणार

आज नागपूरमधील रॅली नंतर कोल्हापूर मध्ये महायुतीच्या सभेला लावणार हजेरी

पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ या ठिकाणी पहिल्या टप्प्यात सभा

महायुतीचे सरकार आणण्यासाठी फडणवीसांकडून मोठ्या संख्येने सभांचे नियोजन

उमेदवारी मागे घेणाऱ्या बंडखोराला शिंदेंचं गिफ्ट

पालघर - शिवसेना शिंदे गटातून बोईसर विधानसभेसाठी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून माघारी घेणाऱ्या जगदीश धोडी यांना एकनाथ शिंदेंकडून गिफ्ट . उमेदवारी अर्ज माघारी घेताच अवघ्या काही तासात जगदीश धोडी यांची शिवसेना शिंदे गटाच्या उपनेतेपदी निवड . तर त्यांचे सहकारी वैभव संखे यांची पालघर सहसंपर्क प्रमुख पदी निवड . अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून जगदीश धोडी तीन दिवसांपासून होते नोट रिचेबल . मात्र मुख्यमंत्र्यांच्या भेटी नंतर धोडी यांनी आपला उमेदवारी अर्ज घेतला होता मागे . मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दोघांनाही काल रात्रीच्या सुमारास दिलं नियुक्त पत्र .

Maharashtra Marathi News Live Updates :  युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात

बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये पवार विरुद्ध पवार असे लढत होत असल्याने या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार अशी लढत होत आहे. युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी स्वतः शरद पवार मैदानात उतरले असून आज शरद पवार शिरसुफळ सुपा मोरगाव आणि सोमेश्वर या ठिकाणी जाहीर सभा घेणार आहेत. संध्याकाळी बारामतीत व्यापारी मेळावा, डॉक्टर मेळावा आणि वकील मेळावा शरद पवार घेणार आहेत.

Pune News : पुण्यात ९ ठिकाणी बंडखोरी कायम

विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघांपैकी ९ ठिकाणी बंडखोरी कायम राहिली आहे.

महाविकास आघाडी आणि महायुतीला काही ठिकाणी बंडखोरांची मनधरणी करण्यात यश आले तर काही ठिकाणी अपयश...

मावळ,भोर, इंदापूर, पुरंदर, जुन्नर, चिंचवड आणि पुण्यातील पर्वती, कसबा आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघांत बंडखोरी झाली आहे.

यात पुण्यातील चार मतदारसंघांत महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार

तर मावळ, भोर, पुरंदर, जुन्नर आणि चिंचवडमध्ये महायुतीच्या पाच उमेदवारांनी बंडाचा झेंडा कायम ठेवला आहे...

बंडखोरांमुळे निवडणुकीमध्ये चुरस निर्माण होणार आहे

Maharashtra News Live Updates : पुण्यातील काँग्रेसच्या बंडखोर नेत्यांना प्रस्ताव दिला जाणार

पुण्यातील काँग्रेसच्या बंडखोर नेत्यांना प्रस्ताव दिला जाणार आहे. अर्ज माघारीची मुदत संपुनही अर्ज कायम ठेवले तरी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर करा अन्यथा पक्षात हकालपट्टीची कारवाई केली जाणार आहे.

काँग्रेसकडून दोन दिवस वाट बघितली जाणार,अन्यथा कारवाईला सामोर जावं लागणार

पर्वतीत आबा बागुल यांची बंडखोरी , शिवाजीनगरला मनीष आनंद तर कसब्यात कमल व्यवहारे यांनी बंडखोरी करत आपले अर्ज कायम ठेवले आहे.त्यामुळे आता काँग्रेसकडून या नेत्यांना प्रस्ताव देण्यात येणार आहे.

पाठिंबा द्या अन्यथा कारवाई केली जाणार

पुण्यात दोन काँगेसच्या विधानसभा मतदासंघात तर एका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या मतदारसंघात काँग्रेस बंडखोर रिंगणात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com