Exam Postponed: दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या, तारखा होणार लवकरच जाहीर

तारखा होणार लवकरच जाहीर होणार
Exam Postponed: दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या, तारखा होणार लवकरच जाहीर
Exam Postponed: दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या, तारखा होणार लवकरच जाहीर Saam Tv
Published On

Board Exam Postponed : काऊन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफेकेट एक्झामिनेशनद्वारे CISCE एक महत्वाची नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. बोर्डकडून घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांना स्थगिती देण्याचा निर्णय यात घेण्यात आला आहे. बोर्डची अधिकृत वेबसाईट cisce.org वर नव्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

हे देखील पहा-

ICSE, ISC सेमीस्टर १ परीक्षा या १५ नोव्हेंबर २०२१ या दिवशी सुरु होणार होते. तर डिसेंबर २०२१ मध्ये संपणार होते. दहावीच्या परीक्षा ६ डिसेंबर दिवशी तर बारावीच्या परीक्षा १६ डिसेंबर दिवशी समाप्त होणार होते. CISCE जारी केलेल्या नोटिफिकेशनमध्ये सांगण्यात आले आहे की काही कारणास्र्व या परीक्षा स्थगित करण्यात आले, असून विद्यार्थ्यांना परीक्षेचे नवे वेळापत्रक लवकरच देण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी बोर्डच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या सूचनेची दखल घ्यावी, लवकरच नव्या तारखा जाहीर करण्यात येणार आहेत असे बोर्डने सांगितले आहे. तरी नेमके कधी या तारखा जाहीर करण्यात येणार आहेत याची मात्र स्पष्टता देण्यात आलेली नाही.

Exam Postponed: दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या, तारखा होणार लवकरच जाहीर
"मी अंतर्ज्ञानी आहे!" चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य...

बोर्डने काही महत्वाचा निर्णय घेतला तर त्याची माहिती बोर्डच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. या अगोदर जाहीर केलेल्या नियमानुसार, पेपर्सचा कालावधी हा १ तासांचा असल्याचे सांगण्यात आले होते. काही पेपर्स हे दीड तासांच्या कालावधीचे असतील. पण आता याबाबत आणखी निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या सर्व पेपर्सचा वेळ हा दीड तासांचा करण्यात येणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com