अजित पवारांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील राजकीय नेते शोकाकुल
राजकीय नेत्यांकडून विमान अपघातावर घातपाताची शक्यता व्यक्त
विमान अपघातावर ज्येष्ठ पत्रकार रोहित चंदावरकर यांचं महत्त्वाचं भाष्य
अजितदादांच्या मृत्यूनंतर संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. राज्यातील विविध ठिकाणी त्यांच्या शोकसभेचा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते शोककुल झाले आहेत. अजितदादांच्या मृत्यूनंतर अनेक राजकीय नेते घातपाताची शक्यता व्यक्त करत आहेत. तर काही जण सखोल चौकशीची मागणी करत आहे. अजितदादांच्या विमान अपघातावर ज्येष्ठ पत्रकार रोहित चंदावरकर यांनी मोठं भाष्य केलं आहे.
ज्येष्ठ पत्रकार आणि एव्हिएशन क्षेत्राचे अभ्यासक रोहित चंदावरकर यांनी अजितदादांच्या बारामती विमान अपघातावर मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी अजितदादांच्या घातपाताचे दावे खोडले. चंदावरकर म्हणाले, 'साधी गोष्ट ही आहे की, अॅव्हिएशन डिपार्टमेंटमधील व्यक्ती आणि अभ्यासकाला माहीत असते की, कोणताही अपघात झाला तर त्याची चौकशी होते. केंद्राच्या अखत्यारीत असलेली कमिटी अपघाताची चौकशी करते. कोणत्याही अपघाताची सखोल चौकशी केली जाते. काही वेळा आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ बोलावूनही चौकशी केली जाते. अजितदादांच्या अपघाताचीही अशीच चौकशी होणार आहे. केंद्र सरकारकडून ऑर्डर देण्यात आली आहे. मी विविध राजकीय नेत्यांना ओळखतो. या राजकीय नेत्यांनी चौकशीचा अहवाल येईपर्यंत अंदाज वर्तवू नये. विशेष म्हणजे त्यांनी हा विषय राजकारणाकडे वळवू नये. हा संपूर्ण तांत्रिक विषय आहे'.
चंदावरकर पुढे म्हणाले, 'बारामती विमानतळ हे व्हिज्युअल फ्लाइट रुट्सनुसार चालणारं विमानतळ आहे. या विमानाच्या लँडिगवेळी हवेत एक राऊंड झाला, यातच अनेक गोष्टी आहेत. लँडिग करताना हवेत घिरट्या मारणे,यातच सर्व गोष्टी आहेत. ही बाब ठरवून झालेली नाही. त्यामुळे घातपाताची शक्यता कमी आहे. विमान तिरपं झालं होतं. सीसीटीव्हीमध्ये व्हिडिओ स्पष्ट दिसत आहे. दृश्यमानता कमी होती, असाही भाग नाही. विमान पूर्वेच्या दिशेला उतरलं. पूर्वेकडून पश्चिमकडे जाणारं लँडिग आहे. लँडिग करताना सकाळी पावणे नऊच्या सुमारास सूर्यकिरणाचा झोत पायलटच्या डोळ्यावर येण्याची शक्यता पायलट मित्र सांगत आहे. लँडिग करण्याची पद्धत, वारा यावर सर्व बाबी अवलंबून असतात'.
'ही लक्षणे दिसत आहे की, यात घातपाताची शक्यता कमी आहे. विमानातील कागदपत्रे जळाली नाहीत, असे काही राजकारणी म्हणत आहेत. राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रियांवर काय बोलावं त्याला अर्थ नाही. अपघाताची शक्यता नाही. तंत्रज्ञानाला मर्यादा असतात. घातापाताची शक्यता असती तर टेक ऑफनंतर घातपात झाला असता. टेकऑफनंतर केबल कापल्या गेल्या असत्या तर शक्यता व्यक्त करण्यात आली असती. टेकऑफनंतर तासाभरानंतर विमान बारामतीत व्यवस्थित पोहोचलं होतं. मला यात राजकारण करायचं नाही. मला कोणत्याही राजकीय व्यक्तीच्या नेत्याच्या प्रतिक्रियेवर बोलायचं नाही. मुंबईहून बारामतीत व्यवस्थित विमान पोहोचलं होतं. लँडिग करताना पहिला प्रयत्न चुकला. दुसरा प्रयत्न करताना विमान तिरपं झालं, असे चंदावरकर यांनी पुढे सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.