vashi news saam tv
मुंबई/पुणे

शिक्षण मंडळाचा वरिष्ठ अधिकारी २० हजारांची लाच घेताना रंगेहाथ सापडला; ACB च्या कारवाईने प्रशासनात खळबळ

acb action News : शिक्षण मंडळातील वरिष्ठ अधिकारी २० हजारांची लाच घेताना रंगेहाथ सापडला आहे. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.

Vishal Gangurde

वाशीच्या शिक्षण मंडळ कार्यालयात एसीबीची मोठी कारवाई

वरिष्ठ अधिकारी राजेंद्र आहिरे यांना एसीबी पथकाडून अटक

अधिकाऱ्याला २० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

विकास मिरगणे, साम टीव्ही

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (वाशी) येथील विभागीय कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याला २० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी रंगेहाथ पकडलंय. राजेंद्र माणिक आहिरे(५५) असे वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव आहे.

राजेंद्र माणिक आहिरे हे विभागात उपसंचालक आणि मुंबई विभागीय मंडळाचे अध्यक्ष होते. एसीबीच्या नवी मुंबई युनिटने सुमारे दुपारी १ वाजण्याच्या सुमारास सापळा रचला. त्यानंतर त्यांना लाच घेताना अटक केली, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांनी दिली. याच प्रकरणात ५० वर्षीय जे स्टोअर्स विभागाचे प्रभारी मनोहर लक्ष्मण पवार यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

काय आहे प्रकरण?

एसीबीच्या माहितीनुसार, तक्रारदार हा एक इलेक्ट्रिकल कंत्राटदार आहे. या कंत्राटदाराला वाशी सेक्टर १६ए येथील शिक्षण मंडळाच्या कार्यालयातील इलेक्ट्रिकल उपकरणांच्या देखभाल आणि दुरुस्तीचे एक वर्षाचे कंत्राट (१ सप्टेंबर २०२५ ते ३१ ऑगस्ट २०२६) मिळाले होतं. या करारानुसार, कंत्राटदाराला दरमहा जीएसटीसह ३१,१५२ रुपये देय होते.

कराराच्या नोव्हेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीतील ३,१६,८०० रुपयांची बिले मंजुरीसाठी सादर करण्यात आली होती. मात्र, कंत्राटदाराची बिले मंजूर करण्यासाठी आहिरे यांनी पवार यांच्या माध्यमातून २२,१७६ रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. लाच मागितल्यानंतर तक्रारदाराने २५ मार्च २०२६ रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली.

तपासात २० हजारांवर तडजोड

६ एप्रिल रोजी करण्यात आलेल्या पडताळणीत आहिरे यांनी पवार यांच्या संगनमताने लाचेची रक्कम कमी केली. त्यानंतर २० हजार रुपये स्वीकारण्यास सहमती दर्शवली. यानंतर ७ एप्रिल रोजी एसीबीने सापळा रचला . त्यावेळी आहिरे यांना त्यांच्या कार्यालयातील केबिनमध्ये तक्रारदाराकडून २० हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पथकाकडून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT