CBI Action: ४ बड्या अधिकाऱ्यांना अटक, लाच घेताना रंगेहाथ पकडलं; CBI ची मोठी कारवाई

CBI Arrested 4 Officers In Delhi: दिल्लीमध्ये सीबीआयने मोठी कारवाई केली. ४ बड्या सरकारी अधिकाऱ्यांना सीबीआयच्या पथकाने अटक केली. या चौघांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईमुळे दिल्लीत खळबळ उडाली.
CBI Action: ४ बड्या अधिकाऱ्यांना अटक, लाच घेताना रंगेहाथ पकडलं; CBI ची मोठी कारवाई
CBI Arrested 4 Officers In DelhiSaam TV
Published On

Summary -

  • दिल्लीमध्ये सीबीआयची मोठी कारवाई

  • ४ सरकारी अधिकाऱ्यांना लाच घेताना अटक

  • भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयकडून पुढील तपास सुरू

  • या कारवाईमुळे दिल्लीत खळबळ उडाली

देशाची राजधानी दिल्लीमध्ये केंद्रीय अन्वेषण ब्युरोने मोठी कारवाई केली. दोन वेगवेगळ्या लाचखोरीच्या प्रकरणाच ४ सरकारी अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक करण्यात आली. या कारवाईमुळे महानगरपालिका आणि पुरातत्व विभागातील कथित भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. पोलिस अधिकाऱ्यांना लाच घेताना अटक करण्यात आल्यामुळे दिल्लीत मोठी खळबळ उडाली आहे.

सीबीआयने ३१ मार्च रोजी दिल्ली महानगरपालिकेच्या शाहदरा उत्तर विभागात कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याविरोधआत तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीमध्ये नुकताच नूतनीकरण केलेले घर न पाडण्यासाठी तक्रारदाराकडे पालिका अधिकाऱ्याने ८०,००० रुपयांची लाच मागितली होती. या अधिकाऱ्याविरोधात सीबीआयने तात्काळ कारवाई केली. १ एप्रिल रोजी या अधिकाऱ्यासह शिपायाला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.

CBI Action: ४ बड्या अधिकाऱ्यांना अटक, लाच घेताना रंगेहाथ पकडलं; CBI ची मोठी कारवाई
Beed: पोलिस दलात खळबळ! बीडमध्ये ACBची मोठी कारवाई, २ पोलिस अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं

सीबीआयने ३० मार्च रोजी जंतर मंतर उप-मंडळात तैनात असलेल्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या (एएसआय) २ अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. एका स्मारक परिचराने संवर्धन सहाय्यक असल्याचे भासवून २४ मार्च रोजी जारी केलेली नोटीस रद्द करण्यासाठी आणि काही विशिष्ट कामे पुढे सुरू करण्याची परवानगी मिळवण्यासाठी तब्बल ३.५ लाख रुपयांची लाच मागितली होती. यावर ३.१० लाखांवर डील झाली. या अधिकाऱ्यालांना लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली.

CBI Action: ४ बड्या अधिकाऱ्यांना अटक, लाच घेताना रंगेहाथ पकडलं; CBI ची मोठी कारवाई
Jalna : जालन्यात २ पोलिसांना एसीबीकडून अटक, वाळू माफियांकडून लाच घेताना रंगेहाथ पकडलं

सीबीआयने चारही अधिकाऱ्यांना सुरूवातीला ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली. सीबीआयकडून भ्रष्टाचाराच्या संपूर्ण व्याप्तीची चौकशी सुरू असून याप्रकरणात आणखी कुणाचा सहभाग होता का? याचा तपास केला जात आहे. सीबीआयने बड्या सरकारी अधिकाऱ्यांविरोधात केलेल्या कारवाईमुळे दिल्लीत खळबळ उडाली आहे.

CBI Action: ४ बड्या अधिकाऱ्यांना अटक, लाच घेताना रंगेहाथ पकडलं; CBI ची मोठी कारवाई
५० हजारांची डील, ५ हजाराचे टोकन घेताना तलाठी रंगेहाथ सापडला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com