मुंबईत 7 जानेवारीपर्यंत जमावबंदी लागू Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Corona Update | कोरोना रुग्णांमध्ये वाढ, मुंबईत 7 जानेवारीपर्यंत जमावबंदी लागू

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुंबईत कोरोना आणि कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत आजपासून 7 जानेवारी 2022 पर्यंत कलम 144 लागू करण्यात आला आहे. (Section 144 imposed in Mumbai till 7th January 2022 due to COVID-19 patients increase)

या अंतर्गत रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, बॅन्क्वेट हॉल, ट्रॅबर्स, दुकाने, दुकाने, दुकाने यासह कोणतेही नवीन वर्षानिमित्तचे कार्यक्रम, गॅदरिंग/पार्टी/ किंवा बंद आणि मोकळ्या जागेत एकत्र जमण्यास मनाई आहे, असे आदेशात नमूद केले आहे.

हेही वाचा -

मुंबईत कोरोना रुग्ण वाढले

बुधवारी मुबंईत कोरोना (Coronavirus news) चे 2510 नवे रुग्ण आढळून आले आहेत. एकूण रुग्णसंख्या 7,75,808 झाली. तर 251 जण कोरोनातून बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे बरे झालेल्यांची एकूण संख्या 7,48,788 झाली. तर एकाचा मृत्यू झाला आहे. मुंबईत रविवारी 922 रुग्ण आढळले होते, सोमवारी 809 रुग्ण आढळले होते. पण मंगळवारी 1,377 रुग्ण सापडले होते. ही आकडेवारी आणि त्यात तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार पहिल्या, दुसऱ्या लाटेप्रमाणे आता तिसरी लाट येणार हे जवळ जवळ निश्चित झाले आहे.

आरोग्यमंत्री काय म्हणाले?

राज्यात 20 जानेवारीदरम्यान 5 ते 6 हजार रुग्ण (Patient) होते, आज मुंबईत संध्याकाळी 2200 रुग्ण होतील. 7 दिवसात सात पट रुग्ण वाढले आहेत. मुंबईत रोज 51 हजार टेस्ट होतात, मुंबईत चार टक्के पॉझिटिव्ह रेट जात आहे. त्यामुळे आपल्याला काळजी घ्यावी लागेल. दिल्लीत सर्व ठिकाणी निर्बंध लावलेत. मुंबईत जर आपण काही गोष्टी कॅज्युअली घेतल्या तर मोठी किंमत मोजावी लागेल. जर आपण नियम पाळत नसू तर मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढतील असा, जाहीर इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिला आहे.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime: मुंबईत १३ वर्षीय मुलावर शौचालयात लैंगिक अत्याचार; मुलुंड परिसरातील धक्कादायक प्रकार

Jasprit Bumrah: नाद करा पण बुमराहचा कुठं.. चेंडू सोडण्याच्या प्रयत्नात बांगलादेशी फलंदाजाची दांडी गुल- VIDEO

Smell Free Shoes Tips : बुटांचा खराब वास येत आहे? या टिप्सने दुर्गंधी होईल मिनिटांत छुमंतर

Sanjay Raut Video : मुख्यमंत्रीपदावरून मविआमध्ये वाद? राऊत काँग्रेसवर भडकले !

PM Vishwakarma Yojana: वर्षभरात ६ लाख लाभार्थी, २ कोटींपेक्षा जास्त लोकांनी केलेय रजिस्ट्रेशन, योजनेचा कसा घ्याल लाभ?

SCROLL FOR NEXT