Corona Update | महाराष्ट्रात 216 दिवसांनंतर सर्वाधिक कोरोना रुग्ण, पुन्हा लॉकडाऊन होणार का?

राज्यात एकाच दिवसात 2,172 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
महाराष्ट्रात 216 दिवसांनंतर सर्वाधिक कोरोना रुग्ण
महाराष्ट्रात 216 दिवसांनंतर सर्वाधिक कोरोना रुग्णSaam Tv
Published On

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाने विस्फोटक स्वरुप धारण केले आहे. राज्यात एकाच दिवसात 2,172 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. 75 दिवसांनंतर एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत तर कोरोनाने रेकॉर्ड मोडला आहे. येथे एका दिवसात 1,377 रुग्ण आढळले आहेत. 216 दिवसांनंतर मुंबईत एकाच दिवसात इतके रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे. महाराष्ट्रातील एकूण कोरोना रुग्णांपैकी 63 टक्के रुग्ण एकट्या मुंबई शहरातील आहे. ही एक गंभीर बाब आहे. (2172 new Corona patients found after 216 days in Maharashtra will there be lockdown again)

महाराष्ट्रात ज्या वेगाने कोरोना (Corona) वाढतोय त्याने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता टाळता येत नाही. गेल्या आठवड्यात मुंबईत एक टक्‍क्‍यांपेक्षा कमी कोरोना रुग्ण आढळले होते. आता ते तीन टक्क्यांच्या जवळपास वाढले आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकार लॉकडाऊनशी संबंधित कडक निर्बंध लादण्याची भीती निर्माण झाली आहे.

हेही वाचा -

महाराष्ट्रात 216 दिवसांनंतर सर्वाधिक कोरोना रुग्ण
..."तर त्याची मोठी किंमत आपल्याला मोजावी लागेल" - आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता

मुंबईने सात महिन्यांचा विक्रम मोडला

मुंबईत गेल्या तीन दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या दुपटीने वाढली आहे. यावरून मुंबईतील कोरोना रुग्णांच्या वाढीचा अंदाज लावता येतो. 25 डिसेंबरला 735 रुग्ण, 28 डिसेंबरला ही संख्या 1,377 वर पोहोचली. हा आकडा गेल्या सात महिन्यांतील सर्वाधिक आहे. 26 मे रोजी म्हणजेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीला 1,352 रुग्ण आढळले होते. मंगळवारी समोर आलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येने त्याचा विक्रम मोडला आहे. सध्या राज्यातील एकूण कोरोना रुग्णांपैकी 63 टक्के रुग्ण हे एकट्या मुंबईतील आहेत. मुंबईत कोरोनामुळे एका दिवसात प्रतिबंधित हाउसिंग कॉम्प्लेक्स संख्या 29 वरून 37 झाली आहे.

मुंबईत 5,803 रुग्णांवर उपचार सुरु

सध्या मुंबईत एकूण 5 हजार 803 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 21 ते 27 डिसेंबर दरम्यान मुंबईतील कोरोनाचा वाढीचा दर 0.9 टक्के झाला आहे. सोमवारी मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी 967 दिवस होता. तो मंगळवारपर्यंत 841 दिवसांवर आला आहे. मंगळवारी 338 लोक कोरोनामधून बरे होऊन घरी गेले. तर एका रुग्णाचा मृत्यू झालाय.

हेही वाचा -

महाराष्ट्रात 216 दिवसांनंतर सर्वाधिक कोरोना रुग्ण
Beed : बोहल्यावरून उतरताच नवरा-नवरीने घेतली कोरोना प्रतिबंधक लस!

महाराष्ट्रात 75 दिवसांनंतर रुग्णांची संख्या सर्वाधिक

महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून बाधितांची संख्या कमी झाली आहे. राज्य सरकारने अनेक प्रकारचे नियम शिथिल केले होते. मात्र गेल्या आठ दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण दुपटीने वाढू लागले आहेत. गेल्या आठवड्यात दररोज कोरोनाचे रुग्ण हजारावर पोहोचले. मात्र या आठवड्याच्या सुरुवातीला ही संख्या दोन हजारांच्या पुढे गेली आहे.

मंगळवारी महाराष्ट्रात कोरोनाच्या 2,172 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 22 जणांचा मृत्यू झालाय. 1,098 लोक कोरोनातून बरे होऊन घरी गेले. यावेळी दिलासा देणारी बाब म्हणजे कोरोनाचा संसर्ग वेगाने होत असला तरी मृतांची संख्या पूर्वीपेक्षा खूपच कमी आहे.

कोरोनासोबत ओमिक्रॉनचे संकटही वाढले

कोरोनासोबतच कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनचे संकटही राज्यात झपाट्याने वाढत आहे. देशात ओमिक्रॉनचे 653 रुग्ण समोर आली आहेत. यातील सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्रात Omicron चे 167 रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ दिल्ली (165), केरळ (57) आणि गुजरात (54) यांचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रातही 91 रुग्ण बरे झाले आहेत.

महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत

महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळले आहेत. मुंबईत ओमिक्रॉनचे 84 रुग्ण आढळले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये 19, पुणे जिल्ह्यात 17 आणि पुणे महापालिकेत 7 प्रकरणे समोर आली आहेत. मुंबईला लागून असलेल्या ठाणे पालिकेत 7 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. सातारा, उस्मानाबाद आणि पनवेलमध्ये 5-5 प्रकरणे समोर आली आहेत. कल्याण-डोंबिवली, औरंगाबाद आणि नांदेडमध्ये 2-2 रुग्ण आढळले आहेत. बुलडाणा, लातूर, अकोला, अहमदनगर, वसई-विरार, नवी मुंबई, मीरा भाईंदर, पालघर, भिवंडी येथून 1-1 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

पुन्हा लॉकडाऊन होणार का?

ओमिक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. ते म्हणाले आहेत की, 'आम्हाला मुंबई आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊन बघायचा नाहीये. आम्ही लोकांवर लॉकडाऊन लादू इच्छित नाही. यामुळेच आम्ही नियमितपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. बैठक घेत आहेत, नियम कडक करण्यावर विचार करत आहेत. पूर्वी बंदी घालण्यात आलेले कार्यक्रम त्या कार्यक्रमांना उपस्थित राहणाऱ्या लोकांची संख्या मर्यादित करत आहेत. पण राज्यात कोरोनावर नियंत्रण मिळवायचे असेल आणि लॉकडाऊन टाळायचे असेल, तर जनतेलाही आपली जबाबदारी समजून घ्यावी लागेल. कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळावे लागतील'.

आरोग्यमंत्री काय म्हणाले?

राज्यात 20 जानेवारीदरम्यान 5 ते 6 हजार रुग्ण (Patient) होते, आज मुंबईत संध्याकाळी 2200 रुग्ण होतील. 7 दिवसात सात पट रुग्ण वाढले आहेत. मुंबईत रोज 51 हजार टेस्ट होतात, मुंबईत चार टक्के पॉझिटिव्ह रेट जात आहे. त्यामुळे आपल्याला काळजी घ्यावी लागेल. दिल्लीत सर्व ठिकाणी निर्बंध लावलेत. मुंबईत जर आपण काही गोष्टी कॅज्युअली घेतल्या तर मोठी किंमत मोजावी लागेल. जर आपण नियम पाळत नसू तर मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढतील असा, जाहीर इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिला आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com