..."तर त्याची मोठी किंमत आपल्याला मोजावी लागेल" - आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता

दिवसाला 700 मेट्रिक टनांपर्यंत ऑक्सिजनचा वापर वाढला की आपण लॉकडाऊन करतो, पण आता तशी परिस्थिती नाहीय असंही त्यांनी स्पष्ट केलं.
..."तर त्याची मोठी किंमत आपल्याला मोजावी लागेल" - आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता
..."तर त्याची मोठी किंमत आपल्याला मोजावी लागेल" - आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंताSaam Tv
Published On

सुशांत सावंत, मुंबई

मुंबई: मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वाढतेय, त्यातच ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेल्यांची देखील संख्या मुंबईत वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी पत्रकार परिषद घेत राज्याला संबोधित केलं आहे. मुंबईत (Mumbai) जर आपण काही गोष्टी कॅज्युअली (गृहीत) घेतल्या तर त्याची मोठी किंमत आपल्याला मोजावी लागेल, जर आपण नियम पाळत नसू तर मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढतील असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. (... "Then we will have to pay a heavy price" - expressed concern about corona by the Minister of Health)

हे देखील पहा -

आपल्या पत्रकार परिषदेत आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, राज्यात 20 जानेवारीच्या दरम्यान 5 ते 6 हजार रुग्ण (Patient) होते, आज मुंबईत संध्याकाळी 2200 रुग्ण होतील. 7 दिवसात सात पट रुग्ण वाढले आहेत. मुंबईत रोज 51 हजार टेस्ट होतात, मुंबईत चार टक्के पॉझिटिव्ह रेट जात आहे त्यामुळे आपल्याला काळजी घ्यावी लागेल. दिल्लीत सर्व ठिकाणी निर्बध लावलेत, मुंबईत जर आपण काही गोष्टी कॅज्युअली घेतल्या तर मोठी किंमत मोजावी लागेल. जर आपण नियम पाळत नसू तर मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढतील असा जाहिर इशारा टोपेंनी दिला आहे.

लोकप्रतिनिधींनी जबाबदारी घ्यायला हवी

पुढे टोपे म्हणाले की, वाढत असलेली रुग्णांची संख्येच ओमिक्रॉनचे (omicron) 167 रुग्ण आहेत. 91 बरे झालेत. आजपर्यंत कुणाचही निधन झालं नाही. लग्न सोहळे मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाला सांगून आता बंधनं आणावे लागतील. लसीकरणाबाबत (Vaccination) लोकांना सकारात्मक करता येईल याची जबाबदारी आता लोकप्रतिनिधींनी घ्यायला हवी असं आवाहन राजेश टोपेंनी सर्वपक्षीय आमदारांना केलं आहे. लसीकरण हे आपले पहिले प्राधान्य असेल, लसीकरण करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. पहिला डोस 8 कोटी लोकांनी घेतला आहे, आपले 9 कोटींचे टार्गेट आहे, 1 कोटी अजून बाकी आहे. साडे पाच कोटी लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. ओमिक्रॉनबाबत प्रोटोकॉल ठरलेले आहेत. हाय रिक्स देशातून येणाऱ्यांचे स्क्रिनिंग सुरू आहे. पंतप्रधान यांनी जी घोषणा केली त्यानुसार 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करायचे आहे अशी माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे.

हातात हात घालून काम करावे

पुढे ते म्हणाले की, कोवॅक्सिनची लस देण्याचा विचार आम्ही करत आहोत. शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना लस देता येणार का हे आम्ही पाहतो आहोत. 3 जानेवारीपासून मुलांचे आम्ही लसीकरण करत आहोत. जे डोस आले ते वापरले जावेत हा आमचा प्रयत्न आहे. घरोघरी जाऊन लसीकरण करायला लोकांना भाग पाडत आहोत. याबाबत जनजागृती देखील करत आहोत. स्थानिक नेते, सामजिक संस्था आणि प्रशासनाने हातात हात घालून काम करावे असं आवाहन राजेश टोपेंनी केलं आहे.

घाबरून जाऊ नका फक्त काळजी घ्या

दररोज होत असलेल्या गर्दीबाबत टोपे म्हणाले की, आपल्याला गर्दी टाळावी लागेल. ज्या गतीने आज रुग्ण वाढत आहे ती धोक्याची घंटा आहे. जर रुग्ण इतके वाढत असतील तर काळजी घेणे गरजेचे आहे. केंद्र सरकारची टीम देखील राज्यात दौरा करत आहे. ही लाट जरी असली तरी राज्याचे आरोग्य विभाग तयारीत आहे त्यामुळे घाबरून जाऊ नका फक्त काळजी घ्या. डबलिंग रेट वाढत आहे ही चिंतेची बाब आहे. दिवसाला 700 मेट्रिक टनांपर्यंत ऑक्सिजनचा वापर वाढला की आपण लॉकडाऊन करतो, पण आता तशी परिस्थिती नाहीय असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com