पुन्हा लॉकडाऊन लागणार ? प्रचंड गर्दी आणि ओमिक्रॉनचे संकट ! केंद्राने लिहिले राज्यांना पत्र

गृह मंत्रालयाने राज्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की त्यांनी त्यांच्या स्तरावर कोरोना आणि नवीन प्रकाराचा सामना करण्यासाठी सज्ज व्हावे.
पुन्हा लॉकडाऊन लागणार ? प्रचंड गर्दी आणि ओमिक्रॉनचे संकट ! केंद्राने लिहिले राज्यांना पत्र
पुन्हा लॉकडाऊन लागणार ? प्रचंड गर्दी आणि ओमिक्रॉनचे संकट ! केंद्राने लिहिले राज्यांना पत्रSaam Tv
Published On

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला, कोरोना ओमिक्रॉनचे संकट वाढतं की काय असा प्रश्न सतावू लागला आहे. या पार्श्वभूमीवर विषाणूचा उद्रेक होऊ नये यासाठी राज्यांकडून सातकर्ता बाळगली जात आहे. दरम्यान, गृह मंत्रालयाने राज्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की त्यांनी त्यांच्या स्तरावर कोरोना आणि नवीन प्रकाराचा सामना करण्यासाठी सज्ज व्हावे. त्यात केंद्राकडून असेही लिहिण्यात आले आहे की, सणासुदीचा काळ पाहता राज्ये त्यांच्या स्तरावर निर्बंध ठरवू शकतात.

ओमिक्रॉनचा (Omicron Variant) धोका जगभरात आणि देशात वाढत चालला आहे. पाहता पाहता Omicron देशातील 19 राज्यांमध्ये पोहोचला आहे. देशात आतापर्यंत ओमिक्रॉनची 578 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. गृह मंत्रालयाने असेही सांगितले आहे की, ओमिक्रॉन आतापर्यंत 116 देशांमध्ये पोहोचला आहे.

हे देखील पहा-

यासाठी आज सोमवारी जारी केलेल्या पत्रात गृह मंत्रालयाने सर्व राज्यांनी योग्य ती पावले उचलावीत आणि आपापल्या स्तरावर दक्षता बाळगावी, असे स्पष्ट लिहिले आहे. तसेच राज्य सरकारकडून आपापल्या राज्यात पत्रकार परिषदांद्वारे नवीन विषाणूची योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यास सांगण्यात आले आहे.

येत्या सणांच्या काळात लोकांनी गर्दी करू नये, गर्दी होऊ नये यासाठी राज्यानेही निर्बंध लादण्याचा विचार करावा, असेही गृह मंत्रालयाने म्हटले आहे. आधी ख्रिसमस (Christmas) आणि आता नवीन वर्ष (New Year) मग मकर संक्रांती (Sankrant) आणि होळी (Holi Festival) इत्यादी सणांनी ओमिक्रॉनबद्दल चिंता वाढवली आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजारात, मॉल्समध्ये झालेल्या गर्दीची अनेक चित्रे समोर आली आहेत. अशा ठिकाणी होणारी गर्दी ही कोरोनाच्या नवीन प्रकाराच्या संकटाला आमंत्रण देणारी आणि त्यामुळे लॉकडाऊन लावण्याच्या शेवटच्या पर्यायाच्या निर्णयाला आमंत्रण देणारी ठरू शकते.

पुन्हा लॉकडाऊन लागणार ? प्रचंड गर्दी आणि ओमिक्रॉनचे संकट ! केंद्राने लिहिले राज्यांना पत्र
'त्या' तरुणीच्या आत्महत्येचा खुलासा; नोकरीचे आमिष दाखवून पोलिसानेच केला बलात्कार

केंद्रीय गृहसचिवांच्या वतीने सर्व राज्यांना हे पत्र लिहण्यात आले आहे. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला म्हणाले की, ओमिक्रॉन डेल्टा (Delta Variant) पेक्षा 3 पट वेगाने पसरतो आहे. यामुळे कोरोना रोखण्यासाठी प्रश्नासमोर एक नवीन आव्हान मानले जात आहे. गृह मंत्रालयाच्या या पत्रात लोकांना सावध राहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी जे नियम केले जातील त्याचे पालन न केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार शिक्षा होऊ शकते, असे लिहिले आहे. असे सांगून त्यांनी यावर भर दिला की कोविड-19 मध्ये वाढ होण्याची शक्यता टाळण्यासाठी चाचणी-ट्रॅक-ट्रीट-लसीकरण आणि कोविड योग्य वर्तनाचे पालन या पाच-पटींच्या धोरणावर सतत लक्ष केंद्रित केले पाहिजे. (Test-Track-Treat-Vaccination and adherence to Covid appropriate behaviour to avoid the possibility of surge in COVID-19 cases)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com