मुळशीत जिल्हा परिषदेची शाळा उध्वस्त
मुळशीत जिल्हा परिषदेची शाळा उध्वस्त  saam tv
मुंबई/पुणे

मुळशीत जिल्हा परिषदेची शाळा उध्वस्त

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अश्विनी जाधव केदारी

विद्येच्या माहेरघरात शाळा उध्वस्त झाल्याची दुर्देवी घटना घडलीय,  पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील भोईनी जिल्हा परिषदेची शाळा जमीनोदस्त झाली, मूळ जागेचे मालक तानाजी शेडगे यांनी ही शाळा पाडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे, 

मुळशी तालुक्यातील लवासा येथील भोईनी गावात जिल्हा परिषदेची शाळा होती, तानाजी शेडगे हे त्या जागेचे मूळ मालक आहेत, ही जागा शेडगे यांच्या मालकीच्या जागेत असल्याचा निकाल नुकताच कोर्टाने दिलेला आहे, मात्र 1995 रोजी या जागेवर  जिल्हा परिषदेने शाळेची इमारत बांधली, तेव्हापासुन गावात त्याच ठिकाणी शाळा चालू होती. इयत्ता 1 ली ते 4 थी पर्यंयची ही शाळा होती, 

हे देखील पहा

त्याची नोंद ग्रामपंचायत दफ्तरी देखील आहे, मात्र 2014 साली जागेचे मूळ मालक शेडगे जागेसंदर्भात कोर्टात गेले, त्यावेळी कोर्टाचा निकाल हा सरकारी वकीलाने भोईनी जिल्हा परिषद शाळेच्या बाजूने दिला होता. मात्र दुसरा निकाल हा जागा मालकाच्या बाजूने लागला, या निकालाच्या आधारे १५ जुलै रोजी शेडगे यांनी शाळेतील साहित्य बाहेर टाकून दिले होते त्यानंतर आज शाळेच्या भिंती पाडल्या.

त्या शाळेच्या बांधकामासाठी जिल्हा परिषदेचा निधी वापरला आहे. तसेच ग्रामपंचायतीचा निधीही देखभालीसाठी वापरण्यात आलेला आहे , येथील ग्रामस्थांनी आमदार संग्राम थोपटे यांना या घटनेची माहिती दिली आहे. आमदार थोपटे तसेच गटविकास अधिकारी संदीप जठार यांनी या प्रकरणी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे. संबंधित जागा मालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करून लवकरात लवकर शाळेची सोय करावी, अशी मागणी भोईनी गावातील ग्रामस्थांनी केली आहे.

Edited by Ashwini jadhav kedari

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : प्रचाराच्या शेवटच्या दिवशी इचलकरंजीत प्रचंड तणाव

Jayant Patil On Election Campaign | सभांना गर्दी कशी होते? जयंत पाटील काय म्हणाले?

Palak Tiwari: श्वेताच्या लेकीचं ट्रेडिशनल सौंदर्य; चाहते घायाळ!

Bald Benefits: जबरदस्त! टक्कल करण्याचे फायदेच फायदे

Perfume Hacks: परफ्यूम जास्त वेळ टिकण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

SCROLL FOR NEXT