pimpri chinchwad shocking  Saam tv
मुंबई/पुणे

चिमुकलीचा हात खेळता खेळता लिफ्टच्या दरजावात अडकला; धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, VIDEO

pimpri chinchwad shocking : तुम्ही तुमच्या चिमुकल्यांना घेऊन लिफ्टमध्ये जात असाल तर सावधान...कारण क्षणभराचं दुर्लक्ष चिमुकल्यासाठी जीवघेणं ठरू शकतं...पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं काय घडलंय..पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...

Bharat Mohalkar

ही दृश्यं आहेत पिंपरी चिंचवडच्या दिघीतील एका सोसायटीतील लिफ्टमधली.... लिफ्टमध्ये सोसायटीचे रहिवासी शिरतात... त्यात दोन महिला.. त्यांच्या हाती दोन चिमुकली बाळं... लिफ्टचं दार बंद होतं... चिमुकली खेळता खेळता लिफ्टच्या दारावर हात ठेवते..

लिफ्ट वरच्या मजल्यावर पोहोचते... दार उघडतं...आणि पुढच्याच क्षणी थरकाप उडवणारी घटना घडते...लिफ्टच्या दारावर ठेवलेलं चिमुकलीचा हात दरवाजाच्या फटीत अडकला आणि चिमुकली किंचाळली तेव्हा दुर्घटना घडल्याचं सर्वांना कळलं....त्यामुळे लिफ्टमधल्या सर्वांचाच थरकाप उडाला...

चिमुकलीचा अडकलेला हात बाहेर काढण्यासाठी सर्वांचीच धावाधाव झाली. कुणी तिचा अडकलेला हात बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होतं...तर कुणी लिफ्टचा दरवाजा बाहेर ओढत होतं...मात्र हे सारं सुरू असताना चिमुकलीच्या जिवाचा आंकांत होत होता...अखेर सर्वांच्या प्रयत्नांमुळे चिमुकलीचा हात बाहेर काढण्यात यश आलं.

पालकांनी आपल्या लहान मुलांना लिफ्टमधून नेताना खबरदारी घेण्याची कशी गरज आहे हे या घटनेमुळे अधोरेखित झालंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

क्रिकेट स्पर्धेसाठी रत्नागिरीत आले अन् अनर्थ घडला! कल्याणच्या दोन मुलांचा डोहात बुडून मृत्यू

Urinary Problem: थांबून-थांबून लघवी होत असेल तर दुर्लक्ष करू नका, गंभीर आजाराचं असू शकतं लक्षण

आईने भावाच्या नावावर शेती केली; मुलाची सटकली, घरात असं काही थरारक घडलं की अख्खं गाव हादरलं

Egg Storage Tips: अंडी फ्रिजमध्ये की फ्रिजबाहेर ठेवावी? जाणून घ्या

Friday Horoscope: आज कोणाला मिळणार नशिबाची साथ? तुमच्या राशीचं भविष्य वाचा

SCROLL FOR NEXT