Bombay High Court Verdict x
मुंबई/पुणे

SBI प्रकरणात अंबानींना मोठा धक्का! मुंबई उच्च न्यायालयाने दिला दणका; नेमकं प्रकरण काय? वाचा

Anil Ambanai : अनिल अंबानी आणि रियालन्स कम्युनिकेशन्सची खाती फसवी म्हणून वर्गीकृत करण्याचा एसबीआयने निर्णय घेतला होता. या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली.

Yash Shirke

  • मुंबई उच्च न्यायालयाने अनिल अंबानी यांची एसबीआयच्या निर्णयाविरोधातील याचिका फेटाळली.

  • एसबीआयने रिलायन्स कम्युनिकेशन्सची खाती फसवी घोषित करत २,९२९ कोटींचे नुकसान झाल्याचा दावा केला होता.

  • न्यायालयाच्या निर्णयामुळे अंबानींना मोठा धक्का बसला असून तपास संस्थांकडून चौकशी तीव्र होण्याची शक्यता आहे.

Court Verdict : मुंबई उच्च न्यायालयाने अनिल अंबानी यांनी केलेली याचिका फेटाळली. उद्योगपती अनिल अंबानी यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या त्यांच्या आणि रिलायन्स कम्युनिकेशन्सची खाती फसवी म्हणून वर्गीकृत करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर उच्च न्यायालयाने निकाल दिला. यामुळे अंबानी यांना धक्का बसल्याचे म्हटले जात आहे.

न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि नीला गोखले यांच्या खंडपीठाने अनिल अंबानी यांच्या याचिकेत तथ्य नसल्याचे सांगितले. या निर्णयाची सविस्तर प्रत अद्याप उपलब्ध नाही. एसबीआयने मागच्या वर्षी ही खाती फसवी म्हणून घोषित केली होती. बँकेने दिलेल्या कर्जाच्या अटींचे उल्लंघन करून निधीचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप केला होता.

अनिल अंबानी यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. बँकेने नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे पालन केले नाही. कारण त्यांना सुनावणीची योग्य संधी देण्यात आली नाही, असा दावा अंबानी यांनी केला होता. वर्गीकरण आदेशातील कागदपत्रे सुरुवातीला प्रदान करण्यात आली नव्हती. सहा महिन्यांनंतर ती प्रदान करण्यात आली असा आरोप त्यांनी केला होता. या वर्षी एसबीआयने केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) तक्रार दाखल केली होती.

तक्रारीनंतर सीबीआयने रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि अंबानी यांच्या मालकीच्या जागेची झडती घेतली. एसबीआयने रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि अनिल अंबानी यांच्या कथित अनियमिततेमुळे २,९२९.०५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याच्या दाव्यावर तक्रार केली होती. या प्रकरणामुळे अंबानी आणि रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या आर्थिक विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. न्यायालयाने याचिका फेटाळल्याने अंबानींच्या कायदेशीर लढाईला धक्का बसल्याचे म्हटले जात आहे. आता तपास संस्थांकडून या प्रकरणाची अधिक सखोल चौकशी केली जाऊ शकते. या निर्णयामुळे अंबानींच्या व्यावसायिक हितसंबंधांवरही परिणाम होतील अशीही शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करावं- प्रसाद लाड

मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट सोशल अकाऊंट, होमगार्डला अटक; जळगाव कनेक्शन आले समोर

Pune News: दहीहंडीत अश्लील नृत्य, पुण्यात डान्सर निशा मुंबईकर अन् शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

Heart Attack : बाहेरून फिट दिसत असलात तरी सावध! हार्ट अटॅकचा धोका वाढवू शकतात या ४ गोष्टी

Bribe Case : पुण्यात API ला २,५०,००० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं, असा सापडला जाळ्यात

SCROLL FOR NEXT