satara pune highway Accident  saam tv
मुंबई/पुणे

Accident News: बेंगळुरूहून मुंबईकडे निघाली ट्रॅव्हल्स बस, साताऱ्यात ड्रायव्हर बदलला; सारोळे उड्डाणपुलाजवळ येताच मोठा अपघात

Satara - Pune Highway Bus Accident : सातारा-पुणे महामार्गावर ट्रव्हल्स बसला मोठा अपघात झाला. अपघातग्रस्त बसमध्ये ३- ते ४० प्रवासी असल्याची माहिती मिळाली.

Nandkumar Joshi

सागर आव्हाड, पुणे | साम टीव्ही

बेंगळुरूहून मुंबईच्या दिशेनं निघालेल्या ट्रव्हल्स बसला सातारा-पुणे महामार्गावर सारोळे उड्डाणपुलाजवळ भीषण अपघात झाला. अपघातग्रस्त बसमध्ये ३० ते ४० प्रवासी असल्याची माहिती साम टीव्हीच्या सूत्रांना मिळाली. या अपघातानंतर बसचा चालक घटनास्थळावरून पसार झाला. सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप आहेत, अशी माहितीही मिळाली.

सातारा-पुणे महामार्गावर ही दुर्घटना घडली. सारोळे उड्डाणपुलाजवळ ट्रॅव्हल बसचा अपघात झाला. ही अपघातग्रस्त बस बेंगळुरूहून मुंबईच्या दिशेने निघाली होती. त्यात ३० ते ४० प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. ही बस साताऱ्यात आली. तिथे आल्यानंतर बसचा चालक बदलण्यात आला होता, अशी माहिती मिळाली आहे.

साताऱ्याहून बस निघाल्यानंतर काही अंतर पार केले. बस सारोळे उड्डाणपुलाजवळ पोहोचली. त्याचवेळी मोठी दुर्घटना घडली. या बसला अपघात झाला. हा अपघात नेमका कशामुळं झाला, याचं कारण समजू शकलेलं नाही. या बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप काही प्रवाशांनी केला.

अपघातानंतर चालक फरार

बस अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला, असे सांगण्यात येत आहे. यामुळं बसमधील प्रवाशांनी संताप व्यक्त केला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातात बसचं नुकसान झालं आहे. तर काही वेळ महामार्गावर गोंधळाचं वातावरण होतं. तर प्रवाशांमध्ये भीती होती.

या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. संबंधित यंत्रणाही अपघाताच्या ठिकाणी पोहोचली. बसमधील प्रवाशांना सुरक्षितस्थळी नेण्यात आले. या अपघाताच्या घटनेचा तपास सुरू आहे. बसचा चालक नेमका कोण होता, तो मद्यधुंद अवस्थेत होता का आणि अपघाताचे नेमके कारण काय, याची चौकशी संबंधित यंत्रणांकडून केली जात आहे. दैव बलवत्तर म्हणून या अपघातातून ३० ते ४० प्रवासी बचावले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: करडे घाटात गोळीबार; सराईत गुन्हेगार विशाल काळेचा मृत्यू

Buttermilk Benefits: जेवल्यानंतर छास का प्यावे? छास प्यायल्याने होतात हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana: कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र ठरवलं? आदिती तटकरेंनी सांगितली सगळी कारणं

भाजप स्लो पॉयझन, शिवसेनेचं मुंडकं उडवण्याचं काम करतंय, कामाख्या देवीला माहितीय; माजी मंत्री अब्दुल सत्तारांचा सनसनाटी आरोप

Success Story : अपमानाचे शब्द थेट काळजाला भिडले! रिक्षाचालकाचा मुलगा थेट IAS अधिकारी झाला

SCROLL FOR NEXT