junnar fire news, sarpanch , aptale sablewadi saam tv
मुंबई/पुणे

Junnar Fire : रात्रीत हाेत्याचं नव्हतं झालं... माजी सरपंचांसह पत्नीचा गुदमरुन मृत्यु; गावावर शाेककळा

पाेलिसांनी घटनेचा तपास सुरु केला आहे.

रोहिदास गाडगे

Pune News : जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील आपटाळे साबळेवाडीचे (aptale sablewadi) माजी सरपंच व त्यांच्या पत्नीचा राहता घरात रात्रीच्या वेळी लागलेल्या आगीमुळे धुराने गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती कळताच पाेलिसांनी माजी सरपंच यांच्या घराकडे धाव घेतली. (Maharashtra News)

या घटनेबाबत पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार आपटाळे येथील साबळेवाडी या छोट्या वस्तीत मारुती भाऊ साबळे हे त्यांच्या पत्नीसमवेत राहत होते. रात्री वीजपुरवठा खंडित झाल्याने साबळे यांनी झोपण्यापूर्वी दिवा लावला होता व ते दोघेही झोपी गेले.

रात्री दिव्याने पेट घेतल्याने टेबल जळून खाक झाला. तसेच घरात आग पसरली. आग वाढल्याने दोघांना जाग आली असता आग विझवण्यासाठी दोघांनी बाथरूमकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र घरात मोठ्या प्रमाणात धूर कोंडलाने दाेघांना श्वास घेण्यात अडचण निर्माण झाली. त्यातच दाेघांचा गुदमरुन मृत्यू झाला आहे.

पाेलिसांनी ग्रामस्थांकडून घटनेची अधिक माहिती घेतली व तपास सुरु केला आहे. या घटनेत माजी सरपंच मारुती भाऊ साबळे (वय 83) व त्यांच्या पत्नी पुताबाई मारुती साबळे (वय 73) यांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती पाेलिसांनी (police) दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Politics: जालन्यात काँग्रेसकडून अजित पवारांना झटका, जवळच्या नेत्याने सोडली साथ

Thursday Horoscope: आर्थिक समस्यांचे मिळणार समाधान, अडकलेले पैसे आज परत मिळणार...

Nagpur: '...तर दोन-चार मंत्र्यांना कापा', रविकांत तुपकरांचं खळबळजनक विधान

Phaltan Doctor Death: अखेरच्या सेल्फीमधून धक्कादायक खुलासा; आत्महत्येआधी डॉक्टर तरुणीची दोघांपैकी एकाशी चॅटिंग

IAS, IPS आणि IRS...; निवडणुकीच्या मैदानात उतरले डॅशिंग निवृत्त अधिकारी, कोण बाजी मारणार?

SCROLL FOR NEXT