Traffic diversions announced across rural Pune for Palkhi 2025; road closures from June 22 to July 3. Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Traffic : पालखी सोहळ्यासाठी पुण्यातील वाहतूक मोठे बदल, घराबाहेर पडण्याआधी वाचा पर्यायी मार्ग

Traffic Diversions in Pune : पुणे-सासवड, पुणे-सोलापूर, बारामती-पाटस, इंदापूर-अकलूज यासारखे मुख्य मार्ग बंद राहतील. पर्यायी मार्ग म्हणून भिगवण, केसनंद, राहू, कळस, न्हावरे, दौंड, बावडा यांचा वापर केला जाईल.

Namdeo Kumbhar

Traffic Diversions in Pune : श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाहतुकीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. या सोहळ्यादरम्यान वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी वाहतूक बदल आणि पर्यायी मार्गांबाबतचे आदेश जारी केले आहेत.

श्री संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज पालखी सोहळा २२ जून ते ३ जुलै दरम्यान पार पडणार आहे. यासाठी पुणे जिल्ह्यातील अनेक प्रमुख मार्ग बंद ठेवण्यात येणार आहेत. सासवड, जेजुरी, नीरा, लोणंद, फलटण, यवत, वरवंड, बारामती, इंदापूर आणि अकलूज परिसरातील वाहतूक प्रभावित होणार आहे. (Complete list of road closures during Sant Dnyaneshwar and Tukaram Maharaj Palkhi 2025)

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यावेळी वाहतूक व्यवस्था Pune-Saswad-Jejuri traffic closed during Sant Dnyaneshwar Palkhi – Know detours

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २२ जून २०२५ रोजी पुणे ते सासवड दरम्यान सासवड येथे मुक्कामी असेल. यावेळी २२ जून पहाटे २ वाजल्यापासून २४ जून रात्री १२ वाजेपर्यंत पुणे-सासवड मार्गावरील दिवेघाट आणि बोपदेवघाट मार्गे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील. या काळात पुण्याहून सासवडकडे जाणारी वाहतूक खडी मशीन चौक-कात्रज-कापूरहोळ मार्गे, तर सासवडहून पुण्याकडे येणारी वाहतूक गराडे-खेड शिवापूर मार्गे वळविण्यात येईल.

२४ ते २५ जून दरम्यान पालखी सासवड-जेजुरी-वाल्हे मार्गे जेजुरी आणि वाल्हे येथे मुक्कामी असेल. या कालावधीत पुणे-सासवड-जेजुरी-वाल्हे-नीरा मार्गे जाणारी वाहतूक २४ जून पहाटे २ वाजल्यापासून २५ जून रात्री १२ वाजेपर्यंत झेंडेवाडी-पारगाव मेमाणे-सुपे-मोरगाव-नीरा मार्गे वळविण्यात येईल. २६ जून रोजी पालखी लोणंद येथे मुक्कामी असेल. या दिवशी पहाटे २ वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत पुणे-सासवड-जेजुरी-वाल्हे-नीरा मार्गावरील वाहतूक सासवड-जेजुरी-मोरगाव मार्गे वळवली जाईल.

२६ ते २८ जून दरम्यान पालखी लोणंदहून फलटणकडे प्रस्थान करेल. यावेळी फलटण-लोणंद-पुणे आणि पुणे-फलटण-लोणंद मार्गावरील वाहतूक शिरवळ मार्गे वळविण्यात येईल.

श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यावेळी वाहतूक व्यवस्था Complete list of road closures during Sant Tukaram Maharaj Palkhi 2025

श्री संत तुकाराम महाराज पालखी २३ जून रोजी लोणीकाळभोर ते यवत दरम्यान यवत येथे मुक्कामी असेल. या दिवशी पहाटे २ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत पुणे-सोलापूर मार्गावरील वाहतूक वाघोली-केसनंद-राहू-पारगाव-चौफुला मार्गे, तर सोलापूरहून पुण्याकडे येणारी वाहतूक चौफुला-पारगाव-राहू-केसनंद-वाघोली मार्गे वळवली जाईल.

२४ जून रोजी पालखी यवत ते वरवंड दरम्यान वरवंड येथे मुक्कामी असेल. यावेळी पुण्याहून सोलापूरकडे जाणारी वाहतूक थेऊर फाटा-केसनंद-राहू-पारगाव-न्हावरे-काष्टी-दौंड-कुरकुंभ मार्गे, तर सोलापूरहून पुण्याकडे येणारी वाहतूक कुरकुंभ-दौंड-काष्टी-न्हावरे-पारगाव-राहू-वाघोली-पुणे मार्गे वळवली जाईल.

२५ जून रोजी पालखी वरवंड ते उंडवडी (ता. बारामती) दरम्यान उंडवडी येथे मुक्कामी असेल. यावेळी पुणे-सोलापूर वाहतूक चौफुला-पारगाव-न्हावरे-काष्टी-दौंड-कुरकुंभ मार्गे, तर सोलापूर-पुणे वाहतूक कुरकुंभ-दौंड-काष्टी-न्हावरे-पारगाव-चौफुला-पुणे मार्गे वळवली जाईल. याच दिवशी बारामती-पाटस आणि बारामती-दौंड मार्ग बंद राहील. या मार्गावरील वाहतूक भिगवण मार्गे वळवली जाईल.

२६ जून रोजी पालखी उंडवडी ते बारामती दरम्यान बारामती शहरात मुक्कामी असेल. यावेळी बारामती-पाटस आणि बारामती-दौंड मार्ग बंद राहील, आणि वाहतूक भिगवण मार्गे वळवली जाईल. २७ जून रोजी पालखी सणसर येथे मुक्कामी असेल. यावेळी जंक्शन-बारामती मार्ग बंद राहील, आणि वालचंदनगर-इंदापूरहून येणारी वाहतूक जंक्शन-कळस-बारामती मार्गे, तर बारामतीहून येणारी वाहतूक भिगवण-कळस-जंक्शन मार्गे वळवली जाईल.

२८ जून रोजी पालखी सणसर ते अंथुर्णे दरम्यान निमगाव केतकी येथे मुक्कामी असेल. बारामती-इंदापूर वाहतूक बारामती-कळंब-बावडा-इंदापूर किंवा बारामती-भिगवण-इंदापूर मार्गे वळवली जाईल. २९ जून रोजी पालखी निमगाव केतकी ते इंदापूर दरम्यान इंदापूर येथे मुक्कामी असेल. यावेळी निमगाव केतकी-इंदापूर मार्ग बंद राहील, आणि इंदापूर-बारामती वाहतूक लोणी देवकर-कळस-जंक्शन किंवा लोणी देवकर-भिगवण मार्गे वळवली जाईल.

३० जून रोजी पहाटे ४ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत अकलूज-बारामती वाहतूक अकलूज-बावडा-नातेपूते-बारामती मार्गे, तर अकलूज-पुणे वाहतूक इंदापूर मुख्य महामार्गावरून वळवली जाईल. इंदापूर शहरातील जुना पुणे-सोलापूर रोड बंद राहील, आणि वाहतूक मालोजीराजे चौक ते महात्मा फुले चौक बाह्यवळण मार्गे वळवली जाईल. १ जुलै आणि ३ जुलै रोजी इंदापूर-अकलूज मार्ग बंद राहील. या मार्गावरील वाहतूक इंदापूर-हिंगवण-टेंभुर्णी-गणेशव-माळीनगर-अकलूज किंवा अकलूज-नातेपूते-वालचंदनगर-जंक्शन-भिगवण मार्गे वळवली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सिगारेट, पैशांच्या बॅगा आणि मंत्री शिरसाट; संजय राऊतांचा व्हिडीओ पोस्ट करत मोठा गौप्यस्फोट

मराठी-हिंदी वादात ब्रिजभूषण सिंहांची उडी,ठाकरेंना थेट धमकी

गौरवास्पद! UNESCO च्या यादीत पुण्यातील तीन किल्ल्यांचा समावेश | VIDEO

Government Scheme : मुलांसाठी सरकारची नवी योजना? मुलांना महिन्याला 3 हजार?

Sleeping Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य दिशा कोणती?

SCROLL FOR NEXT