Maharashtra Political Crisis News
Maharashtra Political Crisis News Saam TV
मुंबई/पुणे

लाठ्या खाऊ, तुरुंगात जाऊ पण...; मुख्यमंत्र्याच्या राजीनाम्यानंतर संजय राऊतांचे सूचक ट्विट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रुपाली बडवे -

मुंबई : शिवसेनेमधील बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाने राज्याच्या मुख्यमंत्र्याचा राजीनामा घेण्यास कारणीभूत ठरलं आहे. महाविकास आघाडी विरुद्ध एकनाथ शिंदे गटाचा सत्तासंघर्ष अखेर मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यामुळे काही प्रमाणात आता कमी होणार आहे. मात्र आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या राजीनामा दिला याला प्रमुख कारण आहे ते म्हणजे आज सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (BhagatSingh Koshyari) यांनी ठाकरे सरकारला उद्या (३० जूनला ) बहुमत सिद्ध करण्यासाठी आदेश दिले होते. शिवसेनेकडून बहुमत चाचणीबाबत सुप्रीम कोर्टात याचिक दाखल केली होती. परंतु, सुप्रीम कोर्टाने उद्याच बहुमत चाचणी होणार असल्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला होता. सध्याचे बंडाळी केलेले आमदार आणि भाजपने बहुमतासाठी केलेली तयारी हे पाहता. सध्यातरी सरकार टिकवण्याचं मोठं आव्हान मगाविकास आघाडी सरकार समोर होतं.

त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मी उद्याच्या चाचणीला सामोरं जाणार नसल्याचं सांगत त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून आपण आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचं स्पष्ट केलं. त्यांच्या याच निर्णयानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक ट्विट करत ये दिन भी निकल जायेंगे, न्याय देवता का सन्मान होगा! फायर टेस्ट fire test अग्नीपरिक्षा की घडी हैं. ये दीन भी निकल जाएंगे..

जय महाराष्ट्र! न्याय देवता का सन्मान होगा! असं त्यांनी म्हटलं आहे. शिवाय काही वेळात त्यांनी दुसरं ट्विट करत मुख्यमंत्र्यांचे कौतुक केलं आहे. तसंच शिवसेनेसाठी हवं ते करु असं आवाहन त्यांनी केलं आहे. मुख्यमंत्री अत्यंत Gracefully जनमानस देखील जिंकले. शिवसेनेच्या भव्य विजयाची ही सुरुवात आहे. लाठ्या खाऊ, रुंगात जाऊ, पण बाळासाहेबांची शिवसेना धगधगत ठेऊ! असही ट्विट केलं आहे. त्यामुळे आता संजय राऊत आत यापुढे काय रणनिती आखणार याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shikhar Bank Scam: शिखर बँक घोटाळ्याची SIT चौकशी करा, मुंबई हायकोर्टात याचिका; अजित पवारांच्या अडचणी वाढणार?

Jalna Lok Sabha: भाजप नेत्यांचा आज राज्यात सभांचा धुराळा; दानवेंच्या प्रचारार्थ अमित शाह जालन्यात

Business Idea: फक्त ५० हजार रुपयांमध्ये सुरू करा 'हा' व्यवसाय; दरमहा होईल बक्कळ कमाई

Bus Fire News: ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या बसला भीषण आग, कर्मचाऱ्यांनी उड्या मारून वाचवला जीव; खळबळजनक घटना

Mumbai News: चिकन शोर्मा खाल्ल्याने अनेकांना विषबाधा; १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, मुंबईतील खळबळजनक घटना

SCROLL FOR NEXT