Sanjay Raut And Imtiyaz Jaleel Saam Tv
मुंबई/पुणे

“औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक होणारे…”; MIMच्या ऑफरवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

"भाजप आणि MIM ची छुपी युती"

जयश्री मोरे

जयश्री मोरे

मुंबई : राज्यात भाजपाला रोखण्यासाठी महाविकास आघाडीसोबत एमआयएम पक्ष एकत्र येऊ पाहत आहे. त्यामुळे आता एमआयएमने राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्र येऊन लढण्याची ऑफर दिली आहे. एमआयएममध्ये १ खासदार, २९ नगरसेवक, २ आमदार आहेत, तर त्यांची राष्ट्रवादीला असलेली ऑफर सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्याचे खासदार इम्तियाज जलील आणि राज्याचे आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादी नेते राजेश टोपे यांच्यात झालेल्या बैठकीनंतर ही चर्चा सुरु झाली आहे. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना एमआयएमसोबत उघड किंवा छुपी हातमिळवणी होऊ शकत नाही असे स्पष्ट केले आहे.

याबाबद्दल आपली प्रतिक्रिया देत असताना संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रात तीन पक्षाचेच सरकार आहे, आणि तीन पक्षाचेच सरकार राहील. शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष हे महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांना मानणारे पक्ष आहेत. एखाद्या पक्षाचे नेते औरंगजेबाच्या कबरी पुढे जाऊन गुडघे टेकतात, ते महाराष्ट्राचे आदर्श होऊ शकत नाहीत किंवा सेनेचे आदर्श होऊ शकत नाहीत. एम आय एम आणि भारतीय जनता पक्षाची छुपी युती आहे. ते तुम्ही उत्तर प्रदेश मध्ये पाहिले आहे, बंगाल मध्ये पाहिले आहे. त्यामुळे आधीच भारतीय जनता पक्ष सोबत काम करत आहे, त्यांच्या बरोबर महाविकास आघाडीचा कुठलाही संबंध होऊ शकत नाही," असे राऊतांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

पुढे ते म्हणाले, "एमआयएम भाजपाची बी टीम असल्याचे आम्ही उत्तर प्रदेशमध्ये पाहिले आहे. आमचे स्पष्ट मत आहे, औरंगजेबाच्या कबरी पुढे नतमस्तक होणारे, कोणीही असतील, ते महाराष्ट्राचे, शिवसेनेचे, आदर्श होऊ शकत नाही, ज्यांच्याबरोबर त्यांची छुपी हातमिळवणी आहे की त्यांना लखलाभ ठरो," असे संजय राऊत म्हणाले.

हे देखील पहा-

काय म्हणाले होते इम्तियाज जलील?

राष्ट्रवादी काँग्रेसला एमआयएमकडून इम्तियाज जलील यांनी युतीसाठी ऑफर दिली आहे. तर काँग्रेसलाही युती करण्यास आव्हान दिले आहे. ते यावेळी बोलताना म्हणाले, “आमच्यावर आरोप करण्यात येतात की भाजपा आमच्यामुळे जिंकते. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भेटायला आले असता त्यांना ऑफर दिली आहे. एकदा हे संपवायचे असेल, तर तुम्ही आमच्यासोबत युती करायला तयार आहात का? त्यावर ते काही बोलले नाहीत. त्यामुळे आता बघायचे आहे की, त्यांना फक्त आरोप करायचे आहेत की त्यांना त्यांची भूमिका सिद्ध करायची आहे”, असे इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raanjhanaa : सोनम कपूरचा 'रांझणा' पुन्हा प्रदर्शित होणार; AIनं चक्क क्लायमॅक्स बदलला, रिलीज डेट काय?

Nagpur : बुद्धिबळाची राणी दिव्या देशमुख नागपूरमध्ये पोहचली! ढोलताशांच्या गजरात स्वागत | VIDEO

Maharashtra Live News Update: नांदणीमधील महादेवी हत्तीनीला परत आणण्यासाठी जनचळवळ सुरू

JioPC: टीव्हीला संगणक बनवा JioPC च्या किफायतशीर प्लॅनसह, फक्त ५९९ रुपयांत

Ladki Bahin Yojana: रक्षाबंधनला लाडकीला ओवाळणी मिळणार! २९८४ कोटींचा निधी वर्ग, खात्यात ₹३००० खटाखट येणार?

SCROLL FOR NEXT